अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक वापरा ः डॉ. देवसरकर

हिंगोली : ‘‘अत्यावश्यक असल्यावरच रासायनिक तणनियंत्रकांचा वापर करावा’’, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी दिला.
Use chemical weed controls only when absolutely necessary: ​​Dr. Devasarkar
Use chemical weed controls only when absolutely necessary: ​​Dr. Devasarkar

हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ रासायनिक पद्धतीऐवजी निंदणी, कोळपणी आदी एकात्मिक तण व्यवस्थापनाच्या पद्धतींवर भर द्यावा. अत्यावश्यक असल्यावरच रासायनिक तणनियंत्रकांचा वापर करावा’’, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी दिला. 

तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रांद्वारे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त भाटेगाव (ता. कळमनुरी) येथील शेतकरी चंद्रकांत गावंडे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट झाली. या वेळी डॉ. देवसरकर बोलत होते. ‘केव्हीके’चे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, पीक संरक्षक विशेषज्ञ अजयकुमार सुगावे, गृहविज्ञान विशेषज्ञ रोहिणी शिंदे, डॉ. कैलास गीते, मनीषा मंगल, संतोष हनवते, बदूसिंग चव्हाण, आबासाहेब कदम, कुबेर राव, मल्लिकार्जुन सोमवारे,  चंद्रशेखर गावंडे, तुकाराम गावंडे, पंडित उपस्थित होते. 

डॉ. देवसरकर यांनी ‘रुंद वरंबा व सरी’ पद्धतीने पेरणी केलेले सोयाबीन, हळदीच्या ठिबकवरील लागवड आणि एकात्मिक पद्धतीने तणव्यवस्थापन आदींची पाहणी केली.

शिंदे यांनी सुपर ग्रेन बॅगच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर केले. सुगावे यांनी विविध पिकांतील कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा, वेगवेगळ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी लागणारे ल्युरची ओळख, वापराचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. डॉ.शेळके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ओळंबे यांनी केले. सुगावे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com