Agriculture news in marathi Use integrated pest management in soybeans: Nagwade | Agrowon

सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करा ः नागवडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांत एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा प्रभावीपणे वापर करावा,’’ असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी शितल नागवडे यांनी केले.

अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांत एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा प्रभावीपणे वापर करावा,’’ असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी शितल नागवडे यांनी केले.

 घुंगर्डे हादगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती.  नागवडे म्हणाले, ‘‘सापळा पिके, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे आणि जैविक किडनाशके यांचा एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वापर करावा. किड व रोग नियंत्रणावरील खर्चात बचत करावी.’’

कृषी सहाय्यक अशोक सव्वाशे म्हणाले, ‘‘तूर, सोयाबिन अशी आंतरपिक पद्धतीमुळे मुख्य पिकांचा कालावधी जेवढा लांब असेल, त्या प्रमाणात तूर पिकाची उत्पादकता कमी होताना आढळते. मुख्य पीक कमी कालावधीचे असल्यास त्याचे अवशेष जमिनीवर पडून तुरीला उपलब्ध होतात. या आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पावसाचे पाणी संपूर्णपणे तुरीला मिळते. वाढीला जागा मिळते व मित्र किडींचे प्रमाण वाढून मुख्य पिकातील प्रमुख किडीपासून तूर पिकाचे संरक्षण होते. अतिरिक्त उत्पादनही मिळून फायदा होतो.’’

 ‘‘सध्या पावसाच्या उघडीपीमुळे, आद्रता वाढल्यामुळे सोयाबीनवर खोड माशी व पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अंड्यातून बाहेर निघालेली पाय नसलेली अळी प्रथम सोयाबिनची पाने पोखरते.  नंतर पानांच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी, किडग्रस्त झाड वाळते. या किडींच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या, पानांच्या देठाचा अळीसह नायनाट करावा,’’ असेही सव्वाशे म्हणाले.

कृषी सहाय्यक गोवर्धन उंडे यांनी निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करावा, या विषयी माहिती दिली. कृषी सहाय्यक विजय जाधव, योगेश तहकिक, अंकुश जुमडे, गणेश फिस्के, सावता काळे, भाऊसिंग पवार, प्रवीण पवार, शिवाजी शिंदेसह शेतकरी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...