agriculture news in Marathi use Intelligence system for HTBT case Maharashtra | Agrowon

एचटीबीटीविरोधात गुप्तचर यंत्रणा वापरा : कृषी विभाग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

अनधिकृत एचटीबीटी विरोधात पोलीस, जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून कडक कारवाई होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एचटीबीटी कपाशीचे बियाणे विकणे बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांनीही सावध व्हावे. अनधिकृत बियाण्यांपासून लांब रहावे. 
- सुहास दिवसे, कृषी आयुक्त

पुणे: राज्यात एचटीबीटी बियाण्यांचा शिरकाव रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचा वापर करावा, अशी सूचना कृषी विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. खरीप नियोजनात लॉकडाऊनमुळे आधीच बियाणे कंपन्या आणि शेतकरी विविध समस्यांचा सामना करीत आहेत. त्यात पुन्हा एचटीबीटी (जनुकीय परावर्तित तणनाशक सहनशील बियाणे) संकट उफाळून येवू नये यासाठी कृषी विभागाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे.
 

‘‘राज्याचा खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे परराज्यातून येणारे एचटीबीटी रोखावे लागेल. सीमा भागातील जिल्ह्यांमध्ये नाकेबंदी करावी. तसेच, पोलीस प्रशासन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शोध मोहिमा राबवावी,’’ असा आग्रह कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धरला आहे. 

गेल्या हंगामात राज्यात एचटीबीटीच्या विरोधात कृषी विभागाने धडाकेबाज कारवाई केली होती. एचटीबीटी टोळांच्या विरोधात पोलिसांनी २८ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केल्याने टोळ्या हादरल्या होत्या. ‘‘एचटीबीटीविरोधी मोहिमांमध्ये गेल्या हंगामात एक कोटी रुपये किमतीची बियाणे पकडली होती. जनुकीय परावर्तित बियाण्यांच्या विरोधात कारवाईचे अधिकार जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीला आहेत. त्यामुळे अशा मोहिमा यंदाही काढाव्यात,’’ असे जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्रात सूचित करण्यात आले आहे.

कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘एचटीबीटीचा विषय हा जैव तंत्रज्ञान समितीच्या अखत्यारीत येतो. या समितीचे अध्यक्षपद थेट जिल्हाधिकाऱ्याकडे असते. त्यामुळे अनधिकृत जनुकीय परावर्तित बियाण्यांच्या वादात अकारण कृषी विभागाला ओढले जाते.’’

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या एचटीबीटी बियाण्यांचे धागेदोर तेलंगणात असल्याचे सांगण्यात आले. या टोळीचा सूत्रधार पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...