यंत्र वापरातून महिलांचा आधुनिक शेतीकडे कल

यंत्र वापरातून महिलांचा आधुनिक शेतीकडे कल
यंत्र वापरातून महिलांचा आधुनिक शेतीकडे कल

चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्‍यातील महिला शेतात यंत्राचा वापर करीत आहे. त्यामुळे महिलांचीही कृषी यांत्रिकीकरणाकडे पावले पडत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी व्यावसायिक व आधुनिक शेतीची कास धरावी, यासाठी कृषी विभागाकडून विविध उपक्रम राबवले जातात. कृषी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी शेतकरीही कृषी अवजारे व यंत्राचा अवलंब करीत आहे. यात महिलाही मागे राहिलेल्या नाहीत, त्याही यंत्रे हाताळून शेतीची कामे करू लागल्या आहेत. 

आगवे येथील ३७ शेतकऱ्यांना कृषी यंत्रे वाटण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सावर्डे येथे शेतकरी मेळावा झाला. तेथे कृषी अवजारे, यंत्राची माहिती देत त्याची दुरुस्ती कशी करावी, याची माहिती देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनाही यंत्र हाताळण्याची कला अवगत केली. सभापती सौ. पूजा निकम यांनीही रोटाव्हेटर ट्रॅक्‍टर चालवून महिलांनी कृषी यात्रिकीकरणाचा अवलंब करण्याचा संदेश दिला होता. आगवे येथील काही महिला शेतीच्या कामात स्वतःचा यंत्राचा वापर करीत आहे. त्यामुळे महिलांचीही कृषी यांत्रिकीकरणाकडे पावले पडत असल्याचे दिसून येत आहे.

कृषी अवजारे हाताळणे फारसे क्‍लिष्ट व अवघड नाही. यातील कला एकदा अवगत झाल्यास अडचण येत नाही. यंत्राची वरवरची दुरुस्तीही आपल्याला करता येऊ शकते. शेती उप्तादन खर्च रोखण्यासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी आम्ही कृषी यंत्राचा प्राधान्याने  वापर करतो. - स्वरा हुमणे, महिला शेतकरी आगवे, ता. चिपळूण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com