कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ. अजंता बिराह

कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ. अजंता बिराह
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ. अजंता बिराह

जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त वापरामुळे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडीची ओळख करूनच योग्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा,’’ असे मत राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नवी दिल्ली येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अजंता बिराह यांनी व्यक्‍त केले. 

वखारी येथील ७५ एकरावर  गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी राबविलेल्या कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकल्पाची त्यांनी इतर शास्त्रज्ञांसह पाहणी केली. त्या वेळी आयोजित ‘कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन शेती दिन’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी व राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नवी दिल्लीतर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे कापूस पिकावरील कीड व्यवस्थापनासाठी १६ कामगंध सापळे प्रति एकर, ट्रायकोग्रामा या जैविक किडींच्या वापरामुळे किडीचे व्यवस्थापन कमी खर्चात झाला आहे. 

शास्त्रज्ञ ए. के. कनोज, वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने, कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, प्रकल्प सहायक कैलास खोडे, महावीर जिनिंगचे प्रमुख संजय छल्लानी, वॉटर संस्थेचे तालुका प्रमुख एस. बी. वैद्य आदी उपस्थित होते. 

प्रा. सोनुने म्हणाले, ‘‘कापूस पिकाच्या शाश्‍वत उत्पादनासाठी कापूस पिकाची आदर्श पद्धतीने वाढ करणे व पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.’’ 

ए. के. कनोज म्हणाले, ‘‘एकात्मिक व्यवस्थापन करून किडीची आर्थिक नुकसान पातळी पाहूनच शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.’’ याप्रसंगी संजय छल्लानी, एस. बी. वैद्य, निवृत्त घुले, रमेश काळे यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले. घुले यांनी आभार मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com