Agriculture news in marathi The use of masks is mandatory in Malegaon taluka | Agrowon

मालेगाव तालुक्यात मास्कचा वापर अनिवार्य 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

मालेगाव, जि. नाशिक : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने हा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होऊ शकते. ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी मालेगाव तालुक्यातील नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी कळविले आहे. 

मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व संबंधित नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य राहणार असून मानांकित प्रतीचे अथवा घरगुती पद्धतीने तयार केलेले व योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतुक करून पुन्हा वापरता येण्याजोगे अथवा स्वच्छ रुमालाने तोंड बांधणे आवश्यक राहील. 

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल व संबंधित व्यक्तीकडून रुपये ५०० इतका दंड वसूल करून तो मुख्यमंत्री सहायता निधी यासाठी जमा करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
 
इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...