विधानसभेसाठी २७ हजार मतदारांकडून ‘नोटा’चा वापर 

विधानसभेसाठी २७ हजार मतदारांकडून ‘नोटा’चा वापर 
विधानसभेसाठी २७ हजार मतदारांकडून ‘नोटा’चा वापर 

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले. यांपैकी २७ हजार मतदारांनी मतदानातून आपला हक्क बजावताना नोटा पर्यायाला पसंती दिली आहे.  नाशिक पूर्व आणि इगतपुरी मतदारसंघातून तीन हजारांपेक्षा अधिक मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर करत उमेदवारांबाबत नापसंती दर्शविली. या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांनी पक्ष बदलून निवडणूक लढविल्याने चुरस निर्माण झाली होती. निवडणूक लढविणाऱ्यांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल किंवा मतदाराला तो मतदान करण्यायोग्य वाटत नसेल तर त्यांच्यासाठी ‘नोटा’ अर्थात ‘नन ऑफ द अबॉव्ह’चा पर्याय देण्यात आला आहे. ईव्हीएममध्ये सर्वांत शेवटी ‘नोटा’चे बटण देण्यात आले आहे. या निवडणुकीत सर्वच मतदारसंघातून उमेदवारांना नाकारणाऱ्या मतदारांची संख्या २६ हजार ९४५ इतकी आहे. इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सर्वाधिक तीन हजार २४ मतदारांनी नोटाचे बटण दाबले. मालेगावमध्ये मतदारसंघात सर्वांत कमी १ हजार १४३ मतदारांनी नोटा पर्याय निवडत उमेदवारांना नाकारले.  दरम्यान, यंदा जिल्ह्यात ६२ टक्के मतदान झाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा टक्का घसरण्याबरोबर ‘नोटा’ दाबण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख ४४ हजार इतकी असतानाही केवळ २८ लाख १८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर २६ हजार ९४५ मतदारांनी ‘नोटा’ दाबून नापसंती दर्शविली. सर्वाधिक नोटाचा वापर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात झाला. या ठिकाणी ३ हजार ५९ मतदारांनी नोटाचा मार्ग निवडला. मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वांत कमी १ हजार १४३ मतदारांनी नोटा दाबत उमेदवारांना नाकारले. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदान केंद्रांपर्यंत मतदार आणण्यासाठीच्या सुविधादेखील दिल्या जातात. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जात असली तरी नोटाचा पर्यायही समोर असल्याने अनेक मतदार नोटाचाही वापर करतात. यंदा तो अधिक करण्यात आल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com