agriculture news in Marathi Use of organic fertilizers will be compulsory Maharashtra | Agrowon

जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत घेण्याचे बंधन टाकणारा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. जैवखत उद्योगाने या हालचालींचे स्वागत केले आहे.

पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत घेण्याचे बंधन टाकणारा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. जैवखत उद्योगाने या हालचालींचे स्वागत केले आहे. 

केंद्र शासनाने खत विक्रीसाठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) प्रणाली यापूर्वीच लागू केली आहे. यामुळे दोन लाख विक्रेत्यांना फक्त ‘पॉस मशीन’च्याच माध्यमातून खत विकण्यास भाग पाडले गेले. सध्या देशातील १३ कोटी ८० लाख शेतकरी खरीप व रबी असे दोन्ही हंगाम मिळून साडेपाच कोटी टन खते ‘डीबीटी’तून विकत घेतात. 

‘डीबीटी’नंतर आता युरियाच्या धोरणात बदल करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत. युरियाच्या प्रत्येक पिशवीची विक्री करताना काही प्रमाणात जैविक खत देखील विकावे, असे बंधन विक्रेत्यावर टाकले जाणार आहे. ही जैविक खते नेमकी कोणती आणि किती द्यायची याविषयी अभ्यास सुरू आहे. 

देशात सर्वांत स्वस्त रासायनिक खत म्हणून युरियाच उपलब्ध आहे. त्यामुळे इतर अत्यावश्यक खतांकडे दुर्लक्ष होते. युरियाचा बेसुमार वापर होतो. त्यातून जमिनीचे आरोग्य धोक्यात येते आणि शेतकऱ्यांची आर्थिक हानी होते, असे केंद्राला वाटते. 

कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता युरियाचे अनुदान वाटप देखील ‘अन्नद्रव्यावर आधारित अनुदान’ (एनबीएस) प्रणालीनुसार वाटले जावे असे वाटते. त्यामुळे प्रत्येक खताच्या ग्रेडमधील अन्नद्रव्याच्या घटकातील प्रमाणानुसार अनुदान वाटले जाईल. सध्या युरिया विक्रीवर ठरावीक अनुदान खत उत्पादक कंपन्यांना मिळते. 

केंद्राचा स्वागतार्ह निर्णय 
युरियाचा बेसुमार वापर कमी करण्यासाठी केंद्राने हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. अर्थात, देर आये पर दुरूस्त आये, असे म्हणता येईल. युरियाच्या अतिवापरात स्फुरद व पालशयुक्त खतांकडे दुर्लक्ष झाले आहे. जैविक खतांचा तर वापर केला जात नाही. बेसुमार युरिया वापरून जमीन, पाणी दूषित झाले आहे. १०० किलो नत्र वापरल्यावर ७० टक्के वाया जाते आहे. शास्त्रीयदृष्ट्या जमिनीला ३० टक्के सेंद्रीय, ३० टक्के जैविक खत मिळायला हवे. ते दिले जात नाही. प्रतिएकरी कोणत्याही शेतात अर्धा ते एक किलो जैविक खत वापरायला हवे, असे कॅन बायोसिसच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका संदिपा कानिटकर यांनी स्पष्ट केले. 

युरिया वापर कमी करणार 

  • देशभरात युरियाचा बेसुमार वापर 
  • इतर अत्यावश्यक खतांकडे होतेय दुर्लक्ष 
  • ‘डीबीटी’नंतर युरिया धोरणात बदलाच्या हालचाली 
  • काही प्रमाणात जैविक खत विकण्याचे बंधन 
  • कोणती आणि किती खते द्यायची याविषयी अभ्यास सुरू 
     

इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...