पीक कीड रोग व्यवस्थापनेसाठी पंचसूत्रीचा अवलंब करा ः अमृत पवार

पीक कीड रोग व्यवस्थापनेसाठी पंचसूत्रीचा अवलंब करा ः अमृत पवार
पीक कीड रोग व्यवस्थापनेसाठी पंचसूत्रीचा अवलंब करा ः अमृत पवार

देऊर, जि. धुळे : हरभरा पीकउत्पादन वाढीसाठी जमिनीची योग्य निवड व मशागत, पेरणीची वेळ, वाणाची निवड व बीज संस्कार, पाणी व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्य पीक कीड रोग व्यवस्थापनेसाठी पंचसूत्रीचा अवलंब करा, असे मंडळ कृषी अधिकारी अमृत पवार यांनी सांगितले.  नवे भदाणे (ता. धुळे) येथे आयोजित क्रॉपसॅप निगडीत शेतीशाळेच्या शेतीदिन कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. शेतकरी भैय्या गोयकर, राजमुद्रा शेतकरी कंपनीचे महेंद्र परदेशी, परमेश्वर पाटील, गोकूळ कारंडे, शालीक खताळ, बंडू मारनर, गोकूळ खताळ, विजय श्रीराम,आबा कारंडे आदी उपस्थित होते. रब्बी हंगामात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) व कृषी विभाग संयुक्त विद्यमाने नवे क्रॉपसॅप निगडित शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान पंधरा दिवसांच्या अंतराने सहा प्रशिक्षण वर्ग शेतकऱ्यांचे घेण्यात आले. यामध्ये हरभरा पीक परिसंस्था, जमीन निवड, बीजसंस्कार, सापळा पीक, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन व मित्रकिडीची ओळख आदी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. महेंद्र परदेशी यांनी सेंद्रिय गटशेतीची माहिती दिली. शेतीदिनाचे आयोजन कृषी सहाय्यक आर. व्ही. बोरसे, संतोष डी. भदाणे, अमोल पाटील, यशवंत वाघ, किरण माळी, पांडुरंग सरगर, पोपट श्रीराम, आबा थोरात, पंडित गोयकर, मोतीलाल खताळ, संजय सुसाणे, गोरख श्रीराम, नाना मारनार यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com