Agriculture news in marathi; Use a protected kit for spraying pesticides: | Page 2 ||| Agrowon

कीटकनाशक फवारणीसाठी संरक्षित किटचा वापर सक्‍तीचा करा ः येरावार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

यवतमाळ  ः जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. यात काहींचा जीवही गेला. या हंगामात आजच्या घडीला ३३ रुग्ण फवारणीबाधित आहेत. यातील ३० जणांनी संरक्षित किटचा वापर केलेला नाही. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना संरक्षक किट वापरणे सक्‍तीचे करावे, अशी सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केली.

यवतमाळ  ः जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. यात काहींचा जीवही गेला. या हंगामात आजच्या घडीला ३३ रुग्ण फवारणीबाधित आहेत. यातील ३० जणांनी संरक्षित किटचा वापर केलेला नाही. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना संरक्षक किट वापरणे सक्‍तीचे करावे, अशी सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कीटकनाशक फवारणी संदर्भाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार, केव्हीकेचे तज्ज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर उपस्थित होते.

कीटकनाशक फवारणी संदर्भात ग्रामीण स्तरावर प्रत्येक ठिकाणी प्रात्यक्षिके घ्यावीत. तसेच फवारणी करणाऱ्यांना ओळखपत्र देण्याचे नियोजन करा. फवारणी करणाऱ्यानेसुद्धा दिवसातून किती वेळा फवारायचे आहे, ते ठरवून घ्यावे. या वेळी फवारणी यंत्राचे उद्‌घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

इतर बातम्या
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई...सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या...
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूचजळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५...
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे...पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड...नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची...
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...