भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बातम्या
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा ः जांगळे
हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असताना उत्पादन दुप्पट होण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी सांगितले.
सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असताना उत्पादन दुप्पट होण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी सांगितले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य विकास कार्यक्रम रब्बी हंगामामधील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवेढ्यातील धर्मगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी माणिक पाटील, बंडू विभुते, पांडुरंग सलगर, मारूती कुचेकर, तातोबा माने, सागर टकले, प्रवीण टकले, संजय पावले, दत्तात्रय टकले, सुरेश टकले, नाना पाटील, बंकट भिंगे, दादा टकले, हनुमंत पाटील उपस्थित होते. श्री. जांगळे म्हणाले की, केवळ उत्पादन काढून उपयोग नाही, त्याची उत्पादकता वाढ महत्वाची आहे. त्या माध्यमातून नफ्या-तोट्याचे गणित आपल्याला समजू शकेल, शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी श्री. जांगळे यांनी कडधान्य पीक उत्पादन वाढीसाठीच्या उपाय योजनाबाबत तसेच हरभऱ्यावरील घाटे आळी तसेच मका व ज्वारीवरील लष्करी अळी नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले.
कृषी सहायकांनी केले मार्गदर्शन
कृषी सहायक मंगेश लासूरकर यांनी कडधान्ये पेरणीवेळी बीजप्रक्रियेमुळे होणारे फायदे तसेच हरभऱ्यावरील किड नियंत्रण बाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक मनीषा कव्हाळे यांनी सेंद्रिय पद्धतीने कडधान्य उत्पादन तंत्राबाबत माहिती दिली. कृषी सहायक प्रशांत काटे यांनी कमी खर्चात उत्पादन वाढ तंत्रज्ञान, तूर पिकाच्या योग्य वेळी शेंडा मारल्यामुळे उत्पन्न उत्पादनात होणारी वाढ तसेच हरभरा शेंडा खुडणीची गरज, कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळेंचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय सलगर यांनी तर उमेश विभूते यांनी आभार मानले.
- 1 of 1540
- ››