Agriculture news in Marathi Use the right technology to increase productivity ः Jangle | Agrowon

उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा ः जांगळे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असताना उत्पादन दुप्पट होण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी सांगितले.

सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असताना उत्पादन दुप्पट होण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी सांगितले.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य विकास कार्यक्रम रब्बी हंगामामधील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवेढ्यातील धर्मगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

या वेळी माणिक पाटील, बंडू विभुते, पांडुरंग सलगर, मारूती कुचेकर, तातोबा माने, सागर टकले, प्रवीण टकले, संजय पावले, दत्तात्रय टकले, सुरेश टकले, नाना पाटील, बंकट भिंगे, दादा टकले, हनुमंत पाटील उपस्थित होते. श्री. जांगळे म्हणाले की, केवळ उत्पादन काढून उपयोग नाही, त्याची उत्पादकता वाढ महत्वाची आहे. त्या माध्यमातून नफ्या-तोट्याचे गणित आपल्याला समजू शकेल, शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी श्री. जांगळे यांनी कडधान्य पीक उत्पादन वाढीसाठीच्या उपाय योजनाबाबत तसेच हरभऱ्यावरील घाटे आळी तसेच मका व ज्वारीवरील लष्करी अळी नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले.

कृषी सहायकांनी केले मार्गदर्शन
कृषी सहायक मंगेश लासूरकर यांनी कडधान्ये पेरणीवेळी बीजप्रक्रियेमुळे होणारे फायदे तसेच हरभऱ्यावरील किड  नियंत्रण बाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक मनीषा कव्हाळे यांनी सेंद्रिय पद्धतीने कडधान्य उत्पादन तंत्राबाबत माहिती दिली. कृषी सहायक प्रशांत काटे यांनी कमी खर्चात उत्पादन वाढ तंत्रज्ञान, तूर पिकाच्या योग्य वेळी शेंडा मारल्यामुळे उत्पन्न उत्पादनात होणारी वाढ तसेच हरभरा शेंडा खुडणीची गरज, कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळेंचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय सलगर यांनी तर उमेश विभूते यांनी आभार मानले.


इतर ताज्या घडामोडी
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...
खानदेशात १७ लाख टन ऊसगाळपजळगाव : खानदेशात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे...
लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्रांना...अमरावती ः लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून...
अकोल्यात शनिवार, रविवारी भाजीपाला...अकोला ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात...
सागंली जिल्ह्यातील पाणीसाठ्यात...सांगली : गेल्या वर्षी चांगले पाऊसमान झाल्याने...
तरंगणारे‌ ‌म्यानमारी‌ ‌टोमॅटो‌!‌ ‌भल्या मोठ्या तळ्यामध्ये पाणगवतांवर थोडीशी माती,...
निफाडच्या दोन शेतकऱ्यांची ७४ हजारांची...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, कांदा या शेतीमालाबाबत...
`कृषी`च्या असहकार्यामुळे समिती...नगर  : जलयुक्‍त शिवार योजनेतून केलेल्या...
सांगलीच्या पशुसंवर्धन विभागात ५१ पदे...सांगली : जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागात ८६...
खानदेशात तुरीच्या खरेदीला शून्य प्रतिसादजळगाव ः खानदेशात तूर खरेदीसाठी यंदा खरेदी...