उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळा

जनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या जागी बांधावीत.मीठ, गूळ, क्षार, लिंबू, ताक, खाण्याचा सोडा ही संजीवन औषधी जनावरांना दररोज द्यावी. शरीर तापमान वाढ दर्शवणाऱ्या जनावरांना तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.
in summer season use water spray on animals for controlling their body temperature
in summer season use water spray on animals for controlling their body temperature

जनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या जागी बांधावीत.मीठ, गूळ, क्षार, लिंबू, ताक, खाण्याचा सोडा ही संजीवन औषधी जनावरांना दररोज द्यावी. शरीर तापमान वाढ दर्शवणाऱ्या जनावरांना तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत. राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे. दररोजचे तापमान ४२ ते ४७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. वातावरणातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे जनावरांची शरीरक्रिया आणि संतुलन बिघडत आहे. अशावेळी जनावरांची काळजी घेणे अनिवार्य आहे. तापमानवाढीमुळे जनावरांच्यामध्ये उष्माघात, गर्भपात, शरीरताप दिसून येत आहे. हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचे आरोग्य बिघडत आहे.सध्या पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण होत असल्याने जनावरांवर ताण आहे. याच काळात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा प्रतिकूल वातावरणामध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उपाययोजना 

  • जनावरे दिवसा चरावयास नेणे पूर्ण बंद करावे. गोठ्यामध्येच चारा पुरवावा.
  • २) जनावरे सावलीत, थंड ठिकाणी, मोकळी - खेळती हवा असणाऱ्या जागी बांधावीत.
  • जनावरांना भरपूर, थंड, सतत पाणी पिण्यासाठी सोय तयार करा.
  • गोठ्याचे छत पेंडी, गवत, पांढरा रंग, पाण्याचा शिडकावा यातून थंड करावे.
  • मीठ, गूळ, क्षार, लिंबू, ताक, खाण्याचा सोडा ही संजीवन औषधी जनावरांना दररोज द्यावी.
  • गरजेप्रमाणे दुपारी जनावरांच्या अंगावर, डोक्‍यावर थंड पाणी शिंपडावे.
  • ताणनाशक वनौषधी पुढील पंधरवड्यास दररोज द्यावी.यामध्ये तुळस, मंजिष्ठा, शतावरी, अश्‍वगंधा, अनंतमूळ, पिंपळी, आवळा वापरावा.
  • म्हशींच्या लहान वासरांची विशेष काळजी आवश्‍यक असून, त्यांना उर्जावर्धक औषधी द्यावी.
  • शेळ्या-मेंढ्या चरावयास नेऊ नका, त्यांना चाराकुट्टी पुरवावी.
  • जनावरांच्या आहारात पशूतज्ज्ञांच्या सल्याने जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क आणि उष्णतारोधक सेलेनियम जीवनसत्त्व ई यांचा वापर करावा.
  • शरीर तापमान वाढ दर्शवणाऱ्या जनावरांना तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करून शक्‍यतो/ वातानुकूलित पद्धतीचा वापर सुरू करावा.
  • गाभण जनावरांचा गर्भपात टाळण्यासाठी दिवसभर पूर्ण सावलीत ठेवा, अस्वस्थ जनावरांवर तातडीने उपचार करावेत.
  • १३) हिरव्या चाऱ्याची पूर्तता हायड्रोपोनिक्‍सद्वारे करावी. प्रथिनांसाठी अझोला पाणवनस्पती वापर करावा.
  • सध्या बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणात आहेत. जनावरांच्या आहारात २० टक्के प्रमाणात याच्या सालींचा वापर करावा.
  • १५) जनावरांच्या आहारात संत्री, मोसंबी, लिंबू, खरबूज, अननस यांचा चोथा नेहमी उपयोगात आणावा.
  • जनावरांच्या नाकासमोर तळहात धरल्यास उष्ण श्‍वास, श्‍वासगती अथवा ल्हाकरणारी जनावरे लक्षात येवू शकतील.
  • श्‍वासाच्या वेळी पोटाचा भाता सतत हलवणारी जनावरे पशुवैद्यकांद्वारे तात्काळ उपचार करून घ्यावीत.
  • शरीराच्या कातडीत पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास चिमटीत येणारी कातडी "चिमटी' दाखवते, अशा जनावरांना तात्काळ पुरेसे सलाईन उपचार गरजेचे आहे.
  • उष्णतेमुळे वावटळी निर्माण होतात, तेव्हा जनावरांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • डोळ्याची आतली त्वचा पांढरी किंवा रक्ताळलेली असल्यास रक्तवर्धक औषधीसह विषबाधा टाळणारी उपाययोजना करावी.
  • मेंढ्यांना लोकरीमुळे उष्णतेचा जास्त त्रास होतो म्हणून बंदिस्त सांभाळ करावा.
  • अन्नदान, उरलेले अन्न, खराब झालेले अन्न जनावरांना अजिबात देऊ नका.
  • शेती परिसरात वन्यप्राणी, पक्षी यांच्यासाठी आवर्जून पाणवठे निर्माण करावेत.
  • २४) पावसाळ्यापूर्वी घटसर्प आणि फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
  • संकटसमयी १८००-२३३-०४१८ किंवा १८००-२३३-३२६८ या मोफत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.
  • संपर्क- डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ डॉ. सुधीर बोरीकर, ९६०४०६१९४७ (पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com