agriculture news in marathi Use sorghum varieties according to soil type | Agrowon

जमिनीच्या प्रकारानुसार वापरा ज्वारी वाण

डॉ. अशोक जाधव, डॉ. मनाजी शिंदे, डॉ. सुरज गडाख
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागाकरिता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण विकसित केले आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागाकरिता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण विकसित केले आहेत. या वाणांची योग्य जमिनीमध्ये लागवड केल्यास उत्पादनात २५ टक्क्यापर्यंत वाढ होत असल्याचे दिसून आहे.

हलकी जमीन- फुले अनुराधा

 • अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
 • पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस.
 • अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम.
 • या वाणाची भाकरीची आणि कडब्याची प्रत उत्कृष्ट आहे.
 • वाणाचे कोरडवाहूमध्ये धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ८ ते १० क्विंटल व कडबा ३० ते ३५ क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.

मध्यम जमीन- फुले सुचित्रा

 • या वाणाची अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली आहे.
 • या जातीस पक्व होण्यास १२० ते १२५ दिवसाचा कालावधी लागतो.
 • या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र आहेत. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.
 • या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन २४ ते २८ क्विंटल तर कडबा उत्पादन ६० ते ६५ क्विंटल कोरडवाहूमध्ये मिळते.
 • हा वाण अवर्षणास, खडखड्या, पानांवरील रोगास, खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम आहे.

भारी जमीन- फुले वसुधा

 • ही जात भारी जमिनीकरीता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारशीत आहे.
 • या जातीस ११६ ते १२० दिवस पक्व होण्यास लागतात.
 • या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार असतात. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.
 • ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
 • या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी २५ ते २८ क्विंटल, तर बागायतीसाठी ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते. कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये ५५ ते ६० क्विंटल, तर बागायतीमध्ये ६० ते ६५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

बागायती क्षेत्र : फुले रेवती 

 • ही जात भारी जमीन व बागायतीसाठी विकसित करण्यात आली आहे.
 • या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे, चमकदार असतात. भाकरीची चव उत्तम आहे व कडबा अधिक पौष्टिक व पाचक आहे.
 • ही जात ११८ ते १२० दिवसात तयार होते.
 • या जातीचे धान्य उत्पादन बागायतीसाठी ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते. तर कडब्याचे उत्पादन ९० ते १०० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
 • ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

ज्वारीच्या इतर उपयोगाकरीता वाण 
फुले मधुर 

 • ही जात ज्वारीच्या हुरड्यासाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसित करण्यात आली आहे.
 • या जातीचा हुरडा ९५ ते १०० दिवसात तयार होतो.
 • या जातीचे हुरडा उत्पादन ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर व कडब्याचे उत्पादन ६५ ते ७० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
 • हुरडा चवीला उत्कृष्ट असून खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

फुले पंचमी 

 • ही जात ज्वारीच्या लाह्यांसाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसित करण्यात आली आहे.
 • ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते.
 • या जातीपासून पांढऱ्या शुभ्र, पूर्ण फुललेल्या लाह्या तयार होतात.
 • या वाणामध्ये गटाण्याचे प्रमाण अत्यल्प असून, लाह्या तयार होण्याचे प्रमाण ८७.४ टक्के इतके आहे.
 • या वाणापासून धान्य उत्पादन १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर मिळते. कडब्याचे उत्पादन ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
 • ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

फुले रोहिणी 

 • ही जात ज्वारीच्या पापडांसाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसित करण्यात आली आहे.
 • ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते.
 • पापडाचा रंग लालसर विटकरी असून खाण्यासाठी कुरकुरीत व चवदार आहे.
 • खोडमाशी,खोडकिडा व मावा या किडीस तसेच खडखड्या रोगास प्रतिकारक्षम असून पाण्याचा ताण सहन करते.
 • या वाणापासून धान्य उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. कडब्याचे उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
 • हा वाण पश्चिम महाराष्ट्राकरिता पापडासाठी शिफारस केला आहे.

संपर्क- डॉ. सुरज गडाख, ७५८८०७९७९१, ०२४२६-२३३०८०
(ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...