पीक संरक्षणासाठी चिकट सापळ्यांचे प्रमाण, वापर

कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य त्या रंगाचा चिकट सापळा पिकांमध्ये वापरल्यास अधिक फायदा होतो. त्यात रसशोषक किडींसाठी पिवळे, फुलकिडे आणि पाने पोखरणारी अळीसाठी निळे आणि उडद्या भुंगेरे व काही ढेकूण वर्गीय किडी पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे वापरावेत.
use of yellow sticky traps for crop protection
use of yellow sticky traps for crop protection

कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य त्या रंगाचा चिकट सापळा पिकांमध्ये वापरल्यास अधिक फायदा होतो. त्यात रसशोषक किडींसाठी पिवळे, फुलकिडे आणि पाने पोखरणारी अळीसाठी निळे आणि उडद्या भुंगेरे व काही ढेकूण वर्गीय किडी पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे वापरावेत.

सर्वेक्षण, कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचे प्रमाण

  • १५ X ३० सेंमी आकाराचा चिकट सापळा- प्रत्येक १०० चौ. मी. साठी एक सापळा - कीड नियंत्रणासाठी,  प्रती १००० चौ. मी. साठी एक सापळा - कीड सर्वेक्षणासाठी.
  • मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी (भाजीपाला पिके)- प्रती १० चौ. मी. या प्रमाणे १०० ते ४०० सापळे प्रती एकर.
  • ३० X ४० सेंमी आकाराचा चिकट सापळा- कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, चवळी – ३६ ते ८० प्रती एकर.
  • सापळ्याचा रंग व आकर्षित होणाऱ्या पीकनिहाय प्रमुख किडी पिवळे चिकट सापळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर), कांदा माशी, फळमाशी, काकडीवरील भुंगेरे, इतर चिलटे, उडद्या भुंगेरे व इतर भुंगेरे, कोबी वरील पांढरे फुलपाखरू इ. पिवळे, निळे चिकट सापळे फुलकिडे, मावा कीड (मध्यम प्रमाणात आकर्षित) निळे चिकट सापळे फुलकिडे आणि पाने पोखरणारी अळीचे पतंग (लीफ मायनर) पांढरे चिकट सापळे उडद्या भुंगेरे व काही ढेकूण वर्गीय किडी  

    पिकाचे नांव किडी
    कपाशी तुडतुडे, मावा, पांढरी माशी, फुलकिडे
    ऊस तुडतुडे, पायरीला
    गहू माशीवर्गीय, भुंगेरे वर्गीय, ढेकूण वर्गीय आणि पाकोळीवर्गीय कीटक
    शुगरबीट फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी
    भुईमूग फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी, पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर)
    वनबाग माशीवर्गीय, भुंगेरे वर्गीय, ढेकूण वर्गीय कीटक
    फळबाग भुंगे वर्गीय, ढेकुण वर्गीय, पाकोळी वर्गीय कीटक
    मका भुंगे वर्गीय, ढेकूण वर्गीय, पाकोळी वर्गीय कीटक
    चारा पिके भुंगे वर्गीय, ढेकूण वर्गीय, पाकोळी वर्गीय कीटक
    मोहरी मावा
    टोमॅटो पांढरी माशी
    काकडी पांढरी माशी, फूलकिडे
    गहू मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि परभक्षी कीटक
    ब्रोकोली फुलकिडे, सिरफीड माशी
    चवळी पांढरी माशी
    टरबूज / खरबूज पांढरी माशी, फुलकिडे
    भाजीपाला -फुलपिके हरितगृह पांढरी माशी
    रताळी पांढरी माशी
    अल्फाअल्फा  तुडतुडे आणि पांढरीमाशी
    काळे मिरे (धारवाड) फुलकिडे, लाल कोळी आणि तुडतुडे
    सफरचंद तुडतुडे आणि मित्रकिडी
    फूल पिके फुलकिडे
    आंबा फुलकिडे १.५ मीटर उंचीवर
    स्ट्रॉबेरी मावा, फुलकिडे
    ब्रोकोली फुलकिडे
    मिरची पांढरी माशी (जमिनीपासून ९० से.मी. उंचीवर)
    फ्रेंच वाल फुलकिडे
    कांदा  फुलकिडे
    कोबी फुलकिडे
    हरितगृहातील पिके मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, परोपजीवी ढेकूण, पायरेट ढेकूण, रोव्ह ढेकूण
    सिमला मिरची पांढरी माशी
    कांदा, लसूण, वांगी, भेंडी, झेंडू, मका, वाल मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी
    भेंडी मावा, तुडतुडे, पांढरी माशी

    चिकट सापळे वापरताना घ्यावयाची काळजी

  • पांढरी माशी व तुडतुडे -  पिकाच्या उंचीपेक्षा १५ सेंमी कमी उंचीवर लावावेत.
  • मावा व फुलकिडे-  पिकाच्या समकक्ष उंचीवर १५ सेंमी पिकापेक्षा जास्त उंचीवर लावावेत.
  • पिकाच्या ओळीपासून २० सेंमी अंतरावर लावावेत.
  • वाऱ्याचा वेग व दिशा लक्षात घेऊन लावावेत किंवा अत्यंत वेगाने वारे वाहत असल्यास त्या वेळेपुरते काढून घ्यावेत.
  • उत्तर पूर्व (ईशान्य) व दक्षिण पश्चिम (नैऋत्य) दिशेला सूर्याच्या दिशेने तिरकस लावावेत.
  • दर ७ ते १० दिवसांनी कीटकांनी माखलेले सापळे ओल्या कापडाने पुसून घेऊन कोरडे करावेत. पुन्हा एरंडी तेल किंवा पांढरे ग्रीस या पैकी एक चिकट पदार्थ लावावा.
  • आंतर मशागत करते वेळी सापळ्यांना बैलाचा किंवा वखर, डवऱ्याचा धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • संपर्क   डॉ. प्रमोद नागोराव मगर, ७७५७०८१८८५ (विषय विशेषज्ञ - कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com