सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर महत्त्वाचा ः डाॅ. कडू

सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर महत्त्वाचा ः डाॅ. कडू
सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर महत्त्वाचा ः डाॅ. कडू

अकोला ः शेतातील काडी कचरा न जाळता खत बनविण्याकरिता उपयोगात आणावे. तसेच सोयाबीन पिकामध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्याकरीता गंधक या खताचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत विद्यापीठाचे विभाग प्रमुख डाॅ. प्रकाश कडू यांनी मांडले.

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प तसेच मैत्रेय फाउंडेशन चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या ग्राम चिलाटी येथे शेतीदिन व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेशीय प्रात्यक्षिकांद्वारे गंधक या खत वापराच्या तंत्रज्ञानाचा प्रसार चिलाटी व शिमोरी येथे करण्यात आला होता. या वेळी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डाॅ. प्रकाश कडू, मैत्रेय फाउंडेशनचे समन्वयक रामेश्वर फड व दिलीप बुसुम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. 

कार्यक्रमास सरपंच काळू रामू बेटेकर, प्रगतशील शेतकरी हप्पू बेटेकर यांच्यासह चिलाटी व शिमोरी तसेच आसपासच्या पंधरा गावातील शेतकरी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधील पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. कडू यांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात डॉ. संदीप हाडोळे, प्रशांत सरप, डॉ. श्याम जाधव, रामेश्वर फड, काळू रामू बेटेकर, डॉ. ययाती तायडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरप यांनी केले, तर संशोधन सहयोगी सूरज लाखे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अमोल पाटील, कृषी सहायक श्रेयस नांदुरकर आदींनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com