तांत्रिक शिक्षणाचा उपयोग शेती संशोधनावर करा ः डॉ. बोंडे

तांत्रिक शिक्षणाचा उपयोग शेती संशोधनावर करा ः डॉ. बोंडे
तांत्रिक शिक्षणाचा उपयोग शेती संशोधनावर करा ः डॉ. बोंडे

अमरावती  ः ‘‘विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असताना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडित पूरक संशोधनाकरिता करावा. शेतकऱ्यांचे जीवन सुखकर कसे होईल, यावरच त्या संशोधनाचा भर राहावा,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री तसेच पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.  येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नावीन्य परिषदेच्या तसेच विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, साहचर्य मंडळ व उन्नत भारत अभियानाच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. स्टार्टअप बिझनेस प्लॅन कमिटीच्या वतीने आयोजित संशोधन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण या वेळी डॉ. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युवा उद्योजक सुहाज गोपीनाथ, सुकाणू समितीचे प्रमुख दिनेश सूर्यवंशी, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातूरकर, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डी. बी. जाधव, नवोक्रम संचालक डॉ. डी. टी. इंगोले उपस्थित होते.  सुरवातीला स्टार्टअप स्पर्धेतील प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. विविध महाविद्यालयांचे २८७ स्पर्धकांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण या ठिकाणी केले होते. त्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. बोंडे म्हणाले, की देशाची ३५ टक्‍के लोकसंख्या ही ३० वर्षांखालील आहे. त्यामुळे भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. तरुणांनी अभ्यासित केलेल्या तंत्रशिक्षणाचा व प्रशिक्षणाचा उपयोग सामान्य जनतेचे जीवन सोयीचे होण्यासाठी करावा. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पावर, शेतीशी निगडित यंत्रसामग्री आदी क्षेत्रांतील संशोधनावर युवकांनी भर दिला पाहिजे. आपल्या क्षेत्रात कापूस पीक खात्रीशीर पीक आहे. त्यावर प्रक्रिया करून उत्तम दर्जाचे वस्त्रनिर्मितीची प्रकल्प उभारण्यासाठी येथील आयटीआय, पॉलिटेक्‍नीक, अभियांत्रीकीया विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. या वेळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com