Agriculture news in marathi; Use technical education on agricultural research: Bonde | Page 2 ||| Agrowon

तांत्रिक शिक्षणाचा उपयोग शेती संशोधनावर करा ः डॉ. बोंडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

अमरावती  ः ‘‘विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असताना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडित पूरक संशोधनाकरिता करावा. शेतकऱ्यांचे जीवन सुखकर कसे होईल, यावरच त्या संशोधनाचा भर राहावा,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री तसेच पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. 

अमरावती  ः ‘‘विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असताना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडित पूरक संशोधनाकरिता करावा. शेतकऱ्यांचे जीवन सुखकर कसे होईल, यावरच त्या संशोधनाचा भर राहावा,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री तसेच पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. 

येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नावीन्य परिषदेच्या तसेच विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, साहचर्य मंडळ व उन्नत भारत अभियानाच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. स्टार्टअप बिझनेस प्लॅन कमिटीच्या वतीने आयोजित संशोधन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण या वेळी डॉ. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युवा उद्योजक सुहाज गोपीनाथ, सुकाणू समितीचे प्रमुख दिनेश सूर्यवंशी, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातूरकर, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डी. बी. जाधव, नवोक्रम संचालक डॉ. डी. टी. इंगोले उपस्थित होते. 

सुरवातीला स्टार्टअप स्पर्धेतील प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. विविध महाविद्यालयांचे २८७ स्पर्धकांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण या ठिकाणी केले होते. त्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. बोंडे म्हणाले, की देशाची ३५ टक्‍के लोकसंख्या ही ३० वर्षांखालील आहे. त्यामुळे भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. तरुणांनी अभ्यासित केलेल्या तंत्रशिक्षणाचा व प्रशिक्षणाचा उपयोग सामान्य जनतेचे जीवन सोयीचे होण्यासाठी करावा. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पावर, शेतीशी निगडित यंत्रसामग्री आदी क्षेत्रांतील संशोधनावर युवकांनी भर दिला पाहिजे. आपल्या क्षेत्रात कापूस पीक खात्रीशीर पीक आहे. त्यावर प्रक्रिया करून उत्तम दर्जाचे वस्त्रनिर्मितीची प्रकल्प उभारण्यासाठी येथील आयटीआय, पॉलिटेक्‍नीक, अभियांत्रीकीया विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. या वेळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...