अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढला

जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सुद्धा युरियाचा वापर वाढला आहे. जुलै अखेर सुमारे तीन हजार टन युरियाचा अधिक वापर झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी युरियाचा अधिकचा वापर टाळावा, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.
The use of urea fertilizer has increased in Akola district
The use of urea fertilizer has increased in Akola district

अकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सुद्धा युरियाचा वापर वाढला आहे. जुलै अखेर सुमारे तीन हजार टन युरियाचा अधिक वापर झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी युरियाचा अधिकचा वापर टाळावा, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात खरिपात सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांसह मूग, उडीद, तूर, ज्वारी ही पिके घेतली जातात. ही पिके डाळवर्गीय आहेत. त्यांच्या मुळांवर जिवाणूच्या गाठी असतात. हे जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून सदर झाडाची नत्राची गरज काही प्रमाणात भागवतात. तसेच पेरणीच्या वेळेस शेतकरी डिएपी १०:२६:२६ या सारख्या खतांची मात्रा देत असतात. त्यामुळे या डाळवर्गीय पिकांना युरिया आता देण्याची गरज नाही, असे असतानाही काही शेतकरी शेतातील पीक पिवळे दिसू लागले की युरियाची मात्रा देतात. यंदाही असाच प्रकार झाल्याने युरियाचा वापर वाढला.

वास्तविक शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पीक पिवळे पडते. अशावेळी शेतकरी युरियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. जास्त पाण्यात हा जमिनीत दिलेला युरिया पिकांना उपयोगी न होता जमिनीत खोलवर पाझरून वाया जातो. अशावेळी शेतकऱ्यांनी २ टक्के युरियाची फवारणी पिकांवर केली तरी ते तुलनात्मकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते, असे कृषी अधिकारी सांगत आहेत. एकंदरीत युरियाच्या अतिरिक्त वापरामुळे श्रम व उत्पादन खर्च तर वाढतोच सोबत शेतजमिनीतील गांडुळांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेपेक्षा अधिक युरियाचा वापर टाळावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत युरियाचा वापर वाढलेला दिसून आला आहे.  काही पिकांना गरज नसतानाही वापर होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे फायदा तितका होत नाही. युरिया केवळ स्वस्त मिळतो म्हणून अनावश्यक, अतिरिक्त वापर शेतकऱ्यांनी टाळला पाहिजे. यामुळे त्यांचे श्रम व उत्पादन खर्च कमी करता येईल. - डॉ. मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com