विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाण्याचा योग्य वापर करा

नांदेड ः गोदावरी नदीवरील डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयाच्या दोन्ही काठावरील शेतकऱ्यांनी नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करावा. पाण्याची नासाडी, अपव्यय टाळावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
Use the water of Vishnupuri project properly

विष्णुपुरी प्रकल्प जलाशयावरील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३०) घेण्यात आली. या बैठकीतील निर्देशानुसार शेतीचा पाणीवापर काही प्रमाणात मर्यादीत करणे आवश्यक असल्याने डॉ. इटनकर यांच्या आदेशानुसार शुक्रवार (ता. १) ते रविवार (ता. १०) पर्यंत या भागातील सिंगल फेज विद्युत पुरवठा वेळापत्रकाप्रमाणे दररोज सुरू राहिल. 

शेतीपंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा एक दिवसआड सुरू ठेवण्यात येईल. त्यानंतर सोमवारी (ता. ११) पाणी वापराची आढावा बैठक घेऊन विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्युत पुरवठा बंद कालावधीत अनाधिकृत विद्युत जोडणी होत असल्यास अवैध पाणी उपसा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. बंद कालावधीत पंप बंद ठेवून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com