agriculture news in marathi, Useful resources for Marathwada projects are as high as 31 percent | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांत उपयुक्‍त साठा ३१ टक्‍क्‍यांवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६७  प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. गत आठवडाभरात जवळपास अकरा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. १७ ऑगस्टपर्यंत २० टक्‍क्यांवर असलेला प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६७  प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. गत आठवडाभरात जवळपास अकरा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. १७ ऑगस्टपर्यंत २० टक्‍क्यांवर असलेला प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३१ ऑगस्टपर्यंत उपयुक्‍त पाणीसाठा ३४.९९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा ४७.४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. त्यामध्ये उपयुक्‍त पाणीसाठा १०२९.०५४ दलघमीवर पोचला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सिनाकोळेगाव प्रकल्पात अजूनही उपयुक्‍त पाणीसाठा झालाच नाही. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्प ९४ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ६३ टक्‍के, निम्न तेरणा प्रकल्प ४० टक्‍के, निम्न दुधना २६ टक्‍के, सिद्धेश्वर २० टक्‍के, माजरा ४ टक्‍के, तर येलदरी प्रकल्पात ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे.

मराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत किंचित घटून १९.८३ टक्‍क्‍यांवर आला आहे. गत आठवड्यात लघू प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा २० टक्‍क्‍यांच्या पुढे होता. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ५५.४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमधील गत आठवड्यात ३०.८८ टक्‍क्‍यांवर असलेला उपयुक्‍त पाणीसाठा या आठवड्यात घटून २६.१२ टक्‍क्‍यांवर आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. अर्धा पावसाळा संपल्यानंतरही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात न झालेली वाढ चिंता वाढविणारी आहे.

लघु प्रकल्पांची संख्या व उपयुक्‍त पाण्याचा टक्‍का
जिल्हा प्रकल्पांची संख्या उपयुक्‍त पाण्याचा टक्‍का
औरंगाबाद ९३ २२
जालना ५७ ०५
बीड १२६ ०५
लातूर १३२ १२
उस्मानाबाद २०१ १९
नांदेड ८८ ४६
परभणी २२ २७
हिंगोली २६ ९४

 

इतर अॅग्रो विशेष
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...