agriculture news in marathi Useful water in 752 small scale projects in Marathwada at 35 percent | Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणी ३५ टक्‍क्‍यांवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 मार्च 2021

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३५ टक्‍क्‍यांवर आला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३५ टक्‍क्‍यांवर आला आहे. एकूण लघू प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील २६ लघूप्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा सर्वात कमी म्हणजे २४ टक्‍क्‍यांवरच आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. 

मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांपैकी सर्वाधिक संख्येने असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ लघू प्रकल्पांत केवळ ३२ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत ३८ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३८ टक्‍के, औरंगाबादमधील ९६ लघू प्रकल्पांत ३८ टक्‍के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ३४ टक्‍के, नांदेडमधील ८८ लघू प्रकल्पांत ४१ टक्‍के, तर परभणीमधील २२ लघू प्रकल्पात केवळ ३६ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. 

लातूरमधील ४, औरंगाबाद व उस्मानाबादमधील प्रत्येकी २ व बीडमधील एक लघू प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. ७४ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यात ७४ लघू व एका मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबादमधील ६, जालन्यातील ७, बीडमधील २१, लातूरमधील १५, उस्मानाबादमधील १६, नांदेडमधील ६, परभणीतील एक व हिंगोलीतील २ लघू प्रकल्पांमधील, लातूर जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

मराठवाड्यातील १६१ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. ३०३ लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, १८३ लघू प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के, तर केवळ १२२ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ७ मध्यम प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणी आहे. २४ मध्यम प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, ३९ मध्यम प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के, तर केवळ ४ मध्यम प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे.

  औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत ६० टक्‍के पाणी
औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत ६० टक्‍के, जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांत ५६ टक्‍के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांत ५७ टक्‍के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पांत ३३ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ मध्यम प्रकल्पांत ५४ टक्‍के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ५० टक्‍के, तर परभणीतील २ मध्यम  प्रकल्पांत ५७ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...