जायकवाडीत ८९.९७ टक्क्यांवर उपयुक्त पाणी

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गत सहा दिवसांत ९ टक्क्यांनी वाढला आहे. २५ ऑगस्ट रोजी ८०.६७ टक्क्यांवर असलेला उपयुक्त साठा सोमवारी (ता. ३१) सकाळी ८९.९७ टक्क्यांवर पोहचला.
 Useful water at 89.97 per cent in Jayakwadi
Useful water at 89.97 per cent in Jayakwadi

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गत सहा दिवसांत ९ टक्क्यांनी वाढला आहे. २५ ऑगस्ट रोजी ८०.६७ टक्क्यांवर असलेला उपयुक्त साठा सोमवारी (ता. ३१) सकाळी ८९.९७ टक्क्यांवर पोहचला, अशी माहिती जायकवाडी प्रकल्पाच्या सूत्रांतर्फे देण्यात आली.

जायकवाडीत आवक झपाट्याने वाढत आहे. १४ ऑगस्ट रोजी गोदावरीच्या पात्रातून प्रकल्पाच्या दिशेने येणारी आवक १८ हजार ७६२ क्यूसेकने सुरू होती. तर, पाणीसाठा ५९ टक्के झाला होता. १५ ऑगस्ट रोजी प्रकल्पात येणारी पाण्याची आवक १९९५२ क्‍युसेकने सुरू होती. तर, पाणीसाठा ६०.४१ टक्क्यांवर पोहोचला होता.

१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता प्रकल्पात येणारी पाण्याची आवक किंचित घटून १७६४८ क्युसेकवर आली. तर, प्रकल्पातील पाणीसाठा ६२.३७ टक्क्यांवर पोहोचला होता. 

१७ ऑगस्ट रोजी जायकवाडीत पाण्याची आवक २२ हजार ४६३ विकणे सुरू होती. त्याच दिवशी सायंकाळी होणारी आवक २२ हजार ७५७ क्युसेकवर पोहोचली होती. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ६६.८२  टक्क्यांवर पोहोचला होता. २५ ऑगस्ट रोजी जायकवाडीत १७२०९ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. २६ ऑगस्ट रोजी प्रकल्पात येणारी आवक घटून १२७०७ क्युसेकवर आली. त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा आवकेत घट झाली. आवक १० हजार ३८२ वरआली होती.

२७ ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा आवकेत वाढ होऊन ती १९ हजार ५८४ वर पोहोचली. सायंकाळी आवक पुन्हा १२९३२ क्यूसेकवर पोहचली. 

२८ ऑगस्ट रोजी सकाळी १२५९७ क्यूसेकने सुरू असलेली पाण्याची आवक सायंकाळी १२०६८ क्‍युसेकने सुरू होती. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १२६४७ क्‍युसेकने  सुरू असलेली पाण्याची आवक त्याच दिवशी सायंकाळी ८६२० पर्यंत खाली आली होती. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९७२३ क्‍युसेकने सुरू असलेली पाण्याची आवक त्याच दिवशी सायंकाळी १२४१३ ३०१ वर पोहोचली होती. 

आवकेत मोठी वाढ  ३१ ऑगस्ट रोजी सकाळी जायकवाडी प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठी वाढ झाली. ही आवक १८ हजार ३५४ क्‍युसेकवर पोहोचली होती. सोमवारी सकाळी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २६९१.३०६ दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा १९५३.२०० दलघमीवर पोहोचला होता, अशी माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com