‘जायकवाडी’तील उपयुक्त पाणी ८० टक्क्यांवर

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा मंगळवारी (ता. २५) ८०.६७ टक्क्यांवर पोहचला आहे,’’ अशी माहिती जायकवाडी प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.
Useful water in Jayakwadi at 80 percent
Useful water in Jayakwadi at 80 percent

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा मंगळवारी (ता. २५) ८०.६७ टक्क्यांवर पोहचला आहे,’’ अशी माहिती जायकवाडी प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. 

प्रकल्प प्रक्षेत्रात व ऊर्ध्व भागात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडीत आवक  झपाट्याने वाढत आहे.  ७ ऑगस्टला जायकवाडी प्रकल्पात २९३६ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ५५.३२ टक्के होता. ८ ऑगस्टला पाण्याची आवक ६ हजार २४७ क्‍युसेक झाली. तर, पाणीसाठा ५५.९९ टक्क्यांवर पोहोचला होता. १४ ऑगस्टला गोदावरीच्या पात्रातून प्रकल्पाच्या दिशेने येणारी आवक १८ हजार ७६२ क्यूसेकवर पोचली. तर, पाणीसाठा ५९ टक्के झाला होता. १५ ऑगस्टला प्रकल्पात येणारी पाण्याची आवक १९९५२ क्‍युसेकने सुरू होती. पाणीसाठा ६०.४१ टक्क्यांवर पोहोचला होता. 

१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता प्रकल्पात येणारी पाण्याची आवक किंचित घटून १७६४८ क्युसेकवर आली. तर प्रकल्पातील पाणीसाठा ६२.३७ टक्क्यांवर पोहोचला होता. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ६६.८२  टक्क्यांवर पोहोचला होता. २५ ऑगस्ट रोजी जायकवाडीत १७२०९ क्‍युसेक ने पाण्याची आवक सुरू होती.

पाणीसाठा २४८९.४१५ दलघमीवर पोहोचला. तर, जिवंत पाणीसाठा १७५१.३०९ दलघमीवर पोहोचला होता. प्रकल्पाच्या उपयुक्त पाण्याची क्षमता पाहता प्रकल्पात ८०.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जायकवाडी प्रकल्पाचा पाणीसाठा सातत्याने वाढत आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे. पाणीसाठा चांगला झाल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. - गणेश खराडकर, धरण नियंत्रण कक्ष, जायकवाडी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com