Agriculture news in marathi, Useful water level below 25 percent in 824 projects of Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यातील ८२४ प्रकल्पांत उपयुक्त पाणी २५ टक्क्यांच्याही खाली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ पैकी ८२४ प्रकल्पांत २५ टक्‍केही उपयुक्‍त पाणी नाही. यामध्ये ७४९ लघू, तर ७५ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. ११ पैकी ५ मोठ्या प्रकल्पांतही उपयुक्‍त पाण्याची वाणवा आहे. दुसरीकडे २०१ लघू, तर १७ मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प, निम्न मनार व विष्णूपुरी हे तीन प्रकल्प आजघडीला तुडुंब आहेत, एवढीच मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब आहे.  

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ पैकी ८२४ प्रकल्पांत २५ टक्‍केही उपयुक्‍त पाणी नाही. यामध्ये ७४९ लघू, तर ७५ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. ११ पैकी ५ मोठ्या प्रकल्पांतही उपयुक्‍त पाण्याची वाणवा आहे. दुसरीकडे २०१ लघू, तर १७ मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प, निम्न मनार व विष्णूपुरी हे तीन प्रकल्प आजघडीला तुडुंब आहेत, एवढीच मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब आहे.  

यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचा अभाव अनुभवलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाचीही अजून म्हणावी तशी समाधानकारक कृपा झाली नाही. वार्षिक सरासरीच्या केवळ ७५ टक्‍केच पाऊस मराठवाड्यात पडला. त्यामुळे प्रकल्पांची तहान भागलीच नाही. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्‍वर, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या पाच प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७५ पैकी १७ मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेठाकच आहेत. २४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे.

बीड, लातूर, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यातील ४१ प्रकल्पात अजूनही ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पाणी साठले नाही. ७४९ पैकी तब्बल २०१ लघू प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २०९ लघू प्रकल्पातील पाणी जोत्याखाली, तर १०२ प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणी आहे. ५७ लघु प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, ३८ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के, तर १४२ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्य सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ ५ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. याच प्रकल्पांमध्ये २०१७ मध्ये ४१ टक्‍के, तर २०१८ मध्ये केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा १५ ऑक्‍टोबरअखेर झाला होता. याचा अर्थ गतवर्षीप्रमाणेच यंदाही जालना दुष्काळाच्या रडारवर आहे.

बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पात यंदा १५ ऑक्‍टोबरअखेर केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. याच तारखेला २०१७ मध्ये हा पाणीसाठा ७१ टक्के, तर २०१८ मध्ये केवळ ५ टक्‍केच होता. 
बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. २०१७ मध्ये याचवेळी ते ९७ टक्‍के, तर २०१८ मध्ये १२ टक्‍के होते. त्यामुळे या जिल्ह्यालाही पुन्हा एकदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे.

लातूर जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. २०१७ मध्ये याचवेळी या प्रकल्पांमध्ये ८१ टक्‍के, तर २०१८ मध्ये ३१ टक्‍के उपयुक्‍त पाणी होते. अर्थात परतीच्या पावसाची दमदार ते जोरदार हजेरी लागून प्रकल्प तुडुंब झाले, तरच संकटाचे ढग थोडे विरळ होण्याची चिन्ह आहेत.

इतर बातम्या
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार...सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्...
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख...बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसानसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि...
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळनाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी...
कापूस उत्पादक प्रकाश पुप्पलवार यांचा...यवतमाळ  ः इंडियन कॉटन असोसिएशन तसेच...
परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (...
उमराणे परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळनाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात...
बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...