agriculture news in marathi Useful water in Marathwada decreased by 2 percent | Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन टक्क्यांनी घट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा गत आठवडाभरात जवळपास दोन टक्‍क्‍यांनी घटला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा गत आठवडाभरात जवळपास दोन टक्‍क्‍यांनी घटला आहे. दुसरीकडे कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पांची संख्याही एकाने वाढली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

प्राप्त माहितीनुसार, १५ जानेवारीअखेर मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ७८.५३ टक्‍के होता. २२ जानेवारीअखेर तो ७६.५३ टक्‍क्‍यांवर आला. दुसरीकडे १५ जानेवारीअखेर ६ असलेली कोरड्या लघु प्रकल्पांची संख्याही २२ जानेवारीअखेर  ७ वर, तर जोत्याखालील लघु प्रकल्पांची संख्या २९ वरून ३४ वर पोचली आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ८७६ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांतील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा २२ जानेवारीअखेर ७६.५३ टक्‍क्‍यांवर आला आहे. १५ जानेवारीअखेर हा उपयुक्‍त पाणीसाठा ७८.७७ टक्‍के होता.

१५ जानेवारीअखेर मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील ८४.५४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा २२ जानेवारीअखेर ८४.५४ टक्‍क्‍यांवर आला आहे. ७५ मध्यम प्रकल्पांतील ७६.१६ टक्‍के उपयुक्‍त पाणी ७३.०८ टक्‍क्‍यांवर आले आहे. ७५२ लघु प्रकल्पातील ५८.२७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आता ५५.२९ टक्‍क्‍यांवर आला आहे. 

औरंगाबादमधील ९६ लघू प्रकल्पांत ५८ टक्‍के उपयुक्त पाणी

७५२ लघु प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ५८ टक्‍के, जालना ५७ प्रकल्पांत ५१ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ५९ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ५७ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ४८ टक्‍के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ६४ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पांत ६२ टक्‍के, तर हिंगोलीतील २६ लघु प्रकल्पांत ५७ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...