मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाचा खंड व अनियमित हजेरी पाणी साठा वाढण्याच्या गतीवर परिणाम करीत असल्याचे चित्र आहे.
Useful water storage in Marathwada at 32 percent
Useful water storage in Marathwada at 32 percent

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाचा खंड व अनियमित हजेरी पाणी साठा वाढण्याच्या गतीवर परिणाम करीत असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ८५ टक्के साठा विष्णुपुरी प्रकल्पात आहे. त्यापाठोपाठ निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के, येलदरी ५६ टक्के, ऊर्ध्व पैनगंगा ४९ टक्के, निम्न तेरणा ४० टक्के, निम्न मनार ३७ टक्के, माजलगाव ३० टक्के, मांजरा १७ टक्के, तर सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

 सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही नाही. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांत २२ टक्के, तर ७५३ लघू प्रकल्पांत केवळ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ४६ टक्के, तसेच तेरणा, मांजरा नदीवरील २५ बंधाऱ्यांत केवळ ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत २३ टक्के, जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ३६ टक्के, बीड जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत २५ टक्के, लातूर जिल्ह्यातील आठ प्रकल्पांत बारा टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत १७ टक्के, नांदेड जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांत २३ टक्के, परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

लघू प्रकल्पात अल्प पाणीसाठा

लघू प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ प्रकल्पांत केवळ सात टक्के, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत ११ टक्के, बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पांत १२ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पांत १७ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातील २०६ प्रकल्पात केवळ दहा टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८८ प्रकल्पांत २६ टक्के, परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत २४ टक्के, हिंगोली जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत फक्त चार टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com