Agriculture news in Marathi Useful water storage in Marathwada at 93 percent | Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ९३ टक्क्यांपुढे गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ९३ टक्क्यांपुढे गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात ९८.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, उर्ध्व पेनगंगा, निम्न तेरणा, निम्न दुधना व सीनाकोळेगाव हे मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पात ९४ टक्के, मांजरा प्रकल्पात ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पात ९२.२० टक्के, ७५२ लघू प्रकल्पात ७९.५८ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ७०.९९ टक्के, तेरणा, मांजरा, रेना  नदीवरील २५ बंधाऱ्यात ९३.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

मोठ्या ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा असून ६७ मध्यम व ५९० लघू प्रकल्पही ७५ टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा साठवून बसले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील एक व बीड जिल्ह्यातील एक मिळून दोन लघू प्रकल्पात अजूनही पाण्याचा थेंब नाही. २१ लघू प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालील असल्याचेही जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ९९ टक्के तर ९६ लघू प्रकल्‍पात ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

जालना जिल्ह्यातील ७ मध्‍यम प्रकल्‍पात १०० टक्के व ५७ लघू प्रकल्‍पात ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के तर १२६ लघू प्रकल्‍पांत ८६ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्‍पांत ८१ टक्के तर ८ मध्यम प्रकल्पांत ६७ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत ९१ टक्के तर २०५ लघू प्रकल्‍पांत ६८ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्‍पांत ९२ टक्के तर नऊ मोठ्या प्रकल्पात १०० टक्के, परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात १०० टक्के तर २२ लघू प्रकल्‍पांत ८७ टक्‍के, हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्‍पांत ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बोंड आळी लघुपाटबंधारे प्रकल्प नादुरुस्त असल्याची माहितीही जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...