Agriculture news in marathi, usefull water storage in Marathwada at 71% | Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍क्‍यांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर महिण्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यांची दशा बदलण्याचे काम केले आहे. आठही जिल्ह्यांतील ८७३ प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर  ७०.८४ टक्‍यांवर जाऊन पोचला आहे. दुसरीकडे या सर्व प्रकल्पांपैकी ६३ लघु-मध्यम प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. १५६ प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर महिण्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यांची दशा बदलण्याचे काम केले आहे. आठही जिल्ह्यांतील ८७३ प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर  ७०.८४ टक्‍यांवर जाऊन पोचला आहे. दुसरीकडे या सर्व प्रकल्पांपैकी ६३ लघु-मध्यम प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. १५६ प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८२.१७ टक्‍के उपयुक्‍त पाणी साठले आहे. जायकवाडी, निम्न मनार, विष्णुपुरी तुडुंब असून येलदरीत ९५ टक्‍के, माजलगावमध्ये ९१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. सिद्धेश्‍वरमध्ये २३ टक्‍के, ऊर्ध्व पेनगंगा ७३ टक्‍के, निम्न तेरणा ३५ टक्‍के, तर निम्न दुधना प्रकल्पात अजूनही केवळ १२ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. सिनाकोळेगाव प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा अजूनही शुन्यावरच आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी बीडमधील पाच व औरंगाबादमधील एक मिळून सहा प्रकल्प कोरडेठाक आहेत. १२ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे.

लातुरमध्ये ३५ प्रकल्पातील पाणी जोत्याखाली

लातूर जिल्ह्यातील १३२ लघुप्रकल्पांमध्ये ५१ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. १३२ प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नसून ३५ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ लघुप्रकल्पांत ३४ टक्‍के पाणी आहे. २०५ प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. ३९ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघुप्रकल्पांत ८२ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. ८८ प्रकल्पांपैकी ५ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पांत ५१ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. एका प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्पांत ८९ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...