Agriculture News in Marathi, Uttar pradesh govt set up krishak samriddhi aayog for double farmer income | Agrowon

उत्तर प्रदेशात शेतकरी समृद्धी अायोगाची स्थापना

वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017
लखनौ, उत्तर प्रदेश ः शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २०२२ पर्यंत दुपटीने वाढ करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने शेतकरी समृद्धी अायोगाची स्थापना केली अाहे. या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच जारी केली अाहे.
 
मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ हे स्वतः या अायोगाचे अध्यक्ष अाहेत. तर निती अायोगाचे सदस्य रमेश चंद यांची समृद्धी अायोगाच्या उपाध्यक्षपदी निवड केली अाहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा अायोग वेळोवेळी सूचना, शिफारशी करणार अाहे.
 
लखनौ, उत्तर प्रदेश ः शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २०२२ पर्यंत दुपटीने वाढ करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने शेतकरी समृद्धी अायोगाची स्थापना केली अाहे. या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच जारी केली अाहे.
 
मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ हे स्वतः या अायोगाचे अध्यक्ष अाहेत. तर निती अायोगाचे सदस्य रमेश चंद यांची समृद्धी अायोगाच्या उपाध्यक्षपदी निवड केली अाहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा अायोग वेळोवेळी सूचना, शिफारशी करणार अाहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अायोगावर राज्याचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (अायसीएअार) प्रतिनिधी, अांतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डाॅ. यू. एस. सिंह तसेच विविध सरकारी खात्यातील अधिकारी, कार्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांचा समावेश करण्यात अाला अाहे. 
 
कमी लागवडीत अधिक शेतमाल उत्पादन वाढविणे, कृषी तंत्रज्ञान, पशुधन, कुक्कटपालन, रेशीम उत्पादन, दुग्धविकास याबाबत अायोग सूचना करणार अाहे. वेगगेवळ्या हवामानाचा अभ्यास करून कृषी विकास साधण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम अायोग करणार अाहे.
 
निवडणुकीदरम्यान भाजपने शेतकरी समृद्धी अायोग स्थापन करण्याचे अाश्नासन दिले होते. या अाश्वासनाची पूर्तता म्हणून अायोगाची स्थापन केली अाहे. याबाबत माहिती देताना राज्याचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही म्हणाले, की शेतकरी समृद्धी अायोगामध्ये कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश केला अाहे. यामुळे कृषितज्ज्ञांकडून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मार्गदर्शन मिळणार अाहे.
 
प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश
राज्य सरकारने स्थापन केलेल्या शेतकरी समृद्धी अायोगात बाराबंकी येथील प्रसिद्ध शेतकरी राम शरण वर्मा, बांदा येथील प्रगतिशील शेतकरी प्रेम सिंह, वाराणसी येथील प्रगतिशील शेतकरी किसान जय प्रकाश सिंह, भारतीय किसान युनियनचे पदाधिकारी धमेंद्र मलिक, लखीमपूर येथील पशुपालक यशपाल सिंह, फूल उत्पादक मुद्ददीन, अंडी उत्पादन घेणारे वेद व्यास सिंह, मत्स्यपालन उद्योजक जनार्दन निषाद यांचा समावेश करण्यात अाला अाहे.
 
शेतकरी समृद्धी अायोग या मुद्द्यावर काम करणार
  • कमी लागवड क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न.  
  • शेतमालाची साठवणूक, वितरणासाठी चांगली यंत्रणा उभारणे.  
  • शेतीतील उत्पन्न काम का कमी झाले, यावर अभ्यास करून उत्पन्नवाढीसाठी शिफारशी करणे.
  • कृषी तंत्रज्ञान, पशुधन, मत्स्यपालन, कुक्कटपालन, रेशीम उत्पादन, दुग्ध विकासासाठी सूचना करणे.

इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...