agriculture news in marathi Uttar Pradesh police arrest Congress leader Priyanka Gandhi | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना अटक

वृत्तसेवा
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

लखीमपूरमधील मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना स्थानिक पोलिसांनी कोणत्याही एफआयआर आणि आदेशाशिवाय तब्बल २८ तास ताब्यात ठेवल्यानंतर अटक केली.

लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य सरकारने चालविलेल्या विरोधकांच्या दडपशाहीचा आता देशभरातून निषेध होऊ लागला आहे. येथे मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना स्थानिक पोलिसांनी कोणत्याही एफआयआर आणि आदेशाशिवाय तब्बल २८ तास ताब्यात ठेवल्यानंतर अटक केली.

भारतीय दंडविधान संहितेच्या ‘कलम-१५१’ अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रियांका यांच्यासमवेत उत्तरप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू, आमदार दिपक सिंह यांनाही अटक करण्यात आली. प्रियांका यांना सितापूर येथील गेस्ट हाउसमध्ये कैद करण्यात आले होते. येथेत तात्पुरता तुरुंग उभारून त्यांना कैदेत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल २८ तासांनंतर स्थानिक पोलिसांनी अन्य दहाजणांसह त्यांना अटक केली आहे. मृत आंदोलक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका येथे आल्या होत्या पण सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारासच त्यांना लखीमपूरला जाण्यापासून रोखण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखत होतो पण आमचे म्हणणे न ऐकल्याने शेवटी त्यांना येथील गेस्ट हाउसवर ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मात्र प्रियांका यांना आज सकाळीच अटक झाल्याचा दावा केला आहे. 

व्हिडिओच्या माध्यमातून निशाणा 
पंतप्रधान मोदींच्या लखनौ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी आज सकाळीच एक व्हिडिओ जारी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी एक जीप आंदोलक शेतकऱ्यांना कशारितीने चिरडत भरधाव वेगाने पुढे जाते हे दाखविण्यात आले होते. याचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, मंत्र्याचा मुलगा हा त्याच्या वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडत असल्याचे स्पष्टपणे दिसते. हा व्हिडिओ पाहा. संबंधित मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का करण्यात आली नाही? त्याच्या मुलाला अद्याप अटक का झालेली नाही? माझ्यासारख्या विरोधी नेत्यांना कोणत्याही एफआयआरशिवाय का अटक केली? असे सवाल प्रियांका यांनी पंतप्रधानांना केले आहेत. 

मृतांमध्ये पत्रकाराचा समावेश 
लखीमपूर येथील हिंसाचारात मरण पावलेल्या आठजणांमध्ये एका स्थानिक पत्रकाराचा देखील समावेश आहे. रमण कश्‍यप असे मरण पावलेल्या पत्रकाराचे नाव असून ते एका स्थानिक वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. कश्‍यप यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. 

ट्विट 
प्रियांका मला पूर्ण खात्री आहे तू कधीच मागे हटणार नाहीस. आमची हिंमत पाहून ते घाबरले असून न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईमध्ये आपण अन्नदात्या शेतकऱ्याला जिंकून दाखवू. 
- राहुल गांधी, नेते काँग्रेस 

प्रतिक्रिया..
भाजपचे सरकार दोषींवर कारवाई करेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांनी हे सरकार उलथवून टाकावे असे आवाहन आम्ही करतो आहोत. जे व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत त्यातून या प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा सहभागी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. 
- अखिलेश यादव, अध्यक्ष समाजवादी पक्ष 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...