साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेप

यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात जोरदार झेप घेतली आहे. लॉकडाउनच्या काळातील अडथळ्यांनाही न जुमानता ३१ मे अखेर तब्बल १२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत राज्याने घोडदौड सुरु केली आहे.
sugar
sugar

कोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात जोरदार झेप घेतली आहे. लॉकडाउनच्या काळातील अडथळ्यांनाही न जुमानता ३१ मे अखेर तब्बल १२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत राज्याने घोडदौड सुरु केली आहे. देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी तब्बल ४७ टक्के साखर उत्तर प्रदेशात तयार झाली आहे.  यंदाच्या हंगामात इतर राज्यापेक्षा कितीतरी पटीने हे उत्पादन जादा आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्तर प्रदेशात मे अखेर ७ लाख टनाने साखरेचे उत्पादन वाढले आहे. अद्याप तिथे हंगाम सुरु असून ११९ पैकी १४ साखर कारखाने सुरु आहेत. उत्तर प्रदेशचे गेल्या काही वर्षातील हे उच्चांकी साखर उत्पादन आहे. २०१८-१९ ला १२० लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा त्याहीपेक्षा ५ लाख टन जास्त उत्पादन झाले आहे. अजूनही जूनच्या मध्यापर्यंत या भागातील साखर कारखाने सुरु राहतील, असा अंदाज उत्तर प्रदेशातील ऊस विभागाचा आहे.  यंदा देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. उत्तर प्रदेश वगळता बहुतांशी राज्यातील साखर हंगाम संपलेला आहे. मे च्या शेवटच्या सप्ताहापर्यंत देशात २६४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी हेच उत्पादन ३२६ लाख टन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशाचे साखर उत्पादन ६२ लाख टनांनी म्हणजे सुमारे १९ टक्क्यांनी घटले आहे. 

महाराष्ट्रासह अन्य राज्ये पिछाडीवर  मे च्या अखेरच्या स्थितीनुसार उत्तर प्रदेशाशिवाय आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्ये यंदा साखर उत्पादनात खूप मागे पडली. पूर अतिवृष्टीसह दुष्काळी परिस्थितीमुळे साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाला स्पर्धा देणारी ही राज्ये यंदा बरीच मागे पडली. याचा परिणामी देशाचे उत्पादन घटण्यावर झाला. या कालावधीत महाराष्ट्रात ६० लाख, कर्नाटकात ३३ लाख, तर तामिळनाडूत ५६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातील गळीत हंगाम संपला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओरिसा या राज्यांनी एकूण मिळून ३२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com