agriculture news in Marathi Uttar pradesh top in sugar production Maharashtra | Agrowon

साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेप

राजकुमार चौगुले
शनिवार, 6 जून 2020

यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात जोरदार झेप घेतली आहे. लॉकडाउनच्या काळातील अडथळ्यांनाही न जुमानता ३१ मे अखेर तब्बल १२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत राज्याने घोडदौड सुरु केली आहे.

कोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात जोरदार झेप घेतली आहे. लॉकडाउनच्या काळातील अडथळ्यांनाही न जुमानता ३१ मे अखेर तब्बल १२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत राज्याने घोडदौड सुरु केली आहे. देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी तब्बल ४७ टक्के साखर उत्तर प्रदेशात तयार झाली आहे. 

यंदाच्या हंगामात इतर राज्यापेक्षा कितीतरी पटीने हे उत्पादन जादा आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्तर प्रदेशात मे अखेर ७ लाख टनाने साखरेचे उत्पादन वाढले आहे. अद्याप तिथे हंगाम सुरु असून ११९ पैकी १४ साखर कारखाने सुरु आहेत. उत्तर प्रदेशचे गेल्या काही वर्षातील हे उच्चांकी साखर उत्पादन आहे. २०१८-१९ ला १२० लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा त्याहीपेक्षा ५ लाख टन जास्त उत्पादन झाले आहे. अजूनही जूनच्या मध्यापर्यंत या भागातील साखर कारखाने सुरु राहतील, असा अंदाज उत्तर प्रदेशातील ऊस विभागाचा आहे. 

यंदा देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. उत्तर प्रदेश वगळता बहुतांशी राज्यातील साखर हंगाम संपलेला आहे. मे च्या शेवटच्या सप्ताहापर्यंत देशात २६४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी हेच उत्पादन ३२६ लाख टन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशाचे साखर उत्पादन ६२ लाख टनांनी म्हणजे सुमारे १९ टक्क्यांनी घटले आहे. 

महाराष्ट्रासह अन्य राज्ये पिछाडीवर 
मे च्या अखेरच्या स्थितीनुसार उत्तर प्रदेशाशिवाय आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्ये यंदा साखर उत्पादनात खूप मागे पडली. पूर अतिवृष्टीसह दुष्काळी परिस्थितीमुळे साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाला स्पर्धा देणारी ही राज्ये यंदा बरीच मागे पडली. याचा परिणामी देशाचे उत्पादन घटण्यावर झाला.

या कालावधीत महाराष्ट्रात ६० लाख, कर्नाटकात ३३ लाख, तर तामिळनाडूत ५६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातील गळीत हंगाम संपला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओरिसा या राज्यांनी एकूण मिळून ३२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...