पशुसंवर्धन विभागाला लागले रिक्‍त पदांचे ग्रहण

Vacancy in Animal Husbandry Department
Vacancy in Animal Husbandry Department

यवतमाळ ः जिल्हा परिषदेच्या पशुरुग्णालयातील अनेक पदे रिक्‍त आहेत. या कामाचा अतिरिक्‍त भार इतर कर्मचाऱ्यांना सोसावा लागत असून पशुपालकांना सेवा मिळण्यातही अडचणीत येत आहेत. त्याची दखल घेत रिक्‍त पदे भरण्यात यावीत, अशी पशुपालकांची मागणी आहे. 

ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आरोग्यसेवेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत पशुरुग्णालयाची सोय आहे. मात्र, या ठिकाणी मंजूर पदांपेकी अर्ध्यावर पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे सेवारत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. त्यात जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची २५ पदे रिक्‍त आहेत. त्याचबरोबर सहायक पशुधन विकास अधिकारी घाटंजी ए, नेर फिरते रुग्णालय एक, ढाणकी फिरते रुग्णालय एक असेशी तीन पदे रिक्‍त आहेत. 

पशुधन पर्यवेक्षकांची एकूण ३८ पदे रिक्‍त आहेत. त्यात यवतमाळ तालुक्‍यात तिवसा एक, कळंब तालुक्‍यातील धोत्रा एक, घाटंजी तालुक्‍यातील तीन, त्यामध्ये चिखलवर्धा, शिवणी, यरणगाव, झरी तालुक्‍यात तीन त्यात गवारा, पाटण, माथार्जुन यांचा समावेश आहे. दारव्हा तालुक्यातील चार त्यात पिंपळखुटा, पेकर्डा, तळेगाव, खोपडी, दिग्रस तालुक्‍यातील मोख व कलगाव, नेर तालुक्‍यात सिरसगाव, उत्तरवाढोणा व चिचगाव, पांढरकवडा तालुक्‍यात पहापळ व पंचायत समिती, पुसद तालुक्‍यात जांबबाजार, फेट्रा, पिंपळगाव, देवढाणा; महागाव तालुक्‍यात पोखरी व पंचायत समिती, मारेगाव पंचायत समितीत एक, राळेगाव तालुक्‍यात जळका व धानोरा, वणी तालुक्‍यात कळमणा, शिंदोला व कोलगाव; उमरखेड तालुक्‍यात मुळावा व विडूळ, आर्णी तालुक्‍यात सदोबा सावळी, इचोरा व बोरगाव या गावांमध्ये रिक्‍त पदे आहेत. विशेष म्हणजे मुख्यालयातील पशुसंवर्धन विभागातही एक रिक्‍त पद आहे. 

दरम्यान ही रिक्‍तपदे भरण्यात यावीत, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पशुपालकांना सुविधा मिळण्यातही यामुळे अडचण होत असल्याने ही रिक्‍तपदे भरावीत, अशी मागणी आहे.

पशुवैद्यकीय रुग्णालयातील रिक्‍त पदे भरण्यासंदर्भात आपण शासनाकडे मागणी केली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावादेखील करण्यात येत आहे. शासनाकडून प्रस्तावाला मान्यता मिळताच पदे भरण्यात येतील. - राजीव खेरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com