agriculture news in marathi, vacant posts in agriculture department, amaravati, maharastra | Agrowon

अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे रिक्त

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग अडचणीत आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातच सुमारे ३२ टक्‍के पदे रिक्‍त आहेत.

अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग अडचणीत आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातच सुमारे ३२ टक्‍के पदे रिक्‍त आहेत.

जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा लागवडीत पुढारलेले आहेत. परंतू गेल्या काही वर्षांपासून या भागात सातत्याने निर्माण होणारी दुष्काळी स्थिती, संत्रा पिकावर येणारे कीड-रोग, आंबिया व मृग बहारातील फळांची गळ अशा अनेक समस्यांनी संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठ तज्ज्ञांकडून या समस्यांच्या निवारणासाठी वेळीच उपाययोजनांची शिफारस केली जात नसल्याचा आरोपही शेतकरी करतात. त्यामुळे संत्रा उत्पादक व इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची भिस्त कृषी विभागावर राहते. परंतू कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागात तब्बल ३२ टक्‍के पदे रिक्‍त आहेत.

याच जिल्ह्यात नजीकच्या काळात सिट्रस इस्टेटची अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांच्या पुरवठ्यासोबतच मार्केटिंगपर्यंत मदत प्रस्तावित आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून या सिट्रस इस्टेटचे सनियंत्रण केले जाणार आहे. परंतू आधीच रिक्‍तपदांमुळे एका व्यक्‍तीकडे अनेक पदांच्या प्रभार असणाऱ्या कृषी विभागाच्या अडचणीत यामुळे भर पडली आहे. विशेष म्हणजे संत्रा लागवड क्षेत्र सर्वाधिक असताना याच जिल्ह्यात फलोत्पादन अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्‍त आहेत.
 

पद मंजूर  रिक्‍त
अतिरिक्‍त प्रकल्प व्यवस्थापक
तालुका कृषी अधिकारी १४
जैविक कीड नियंत्रण अधिकारी
तंत्र अधिकारी ७ 
उप प्रकल्प व्यवस्थापक
मंडळ कृषी अधिकारी ३४ १६
फलोत्पादन अधिकारी
कृषी अधिकारी १९   १५
कृषी पर्यवेक्षक ९९ ४१
कृषी सहायक  ४४५  ६०

 


इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...“बळीवंत आम्ही, मातीतला दास धरलेली कास, मरणाची”...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...