जनावरांना लाळ्या खुरकुतची लस टोचा : डॉ. भारूड

नंदुरबार : ‘‘जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ‘लाळ्या खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.
 Vaccinate animals of lalya khutkut: Dr. Bharud
Vaccinate animals of lalya khutkut: Dr. Bharud

नंदुरबार  : ‘‘जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ‘लाळ्या खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.

लाळ्या, खुरकुत हा पशुधनातील विषाणूजन्य रोग आहे. या रोगास लाळ्या, तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. प्रामुख्याने हा रोग पायात द्विखुरी असलेल्या जनावरामध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार हवेवाटे, हवा वाहणाऱ्या दिशेने, कळपातल्या कळपात बाधित जनावरांमुळे, जनावरांची पाणी प्यावयाची जागा, गव्हाणी व लागणारी भांडी, गुरांचे बाजार, आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखाने, इत्यादी ठिकाणांहून अधिक प्रमाणात होतो.

या रोगामुळे जनावंरामधील मृत्यूदर जरी कमी असला, तरी रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे गाई- म्हशींचे दूध देणे कमी होते. तसेच शेतीकाम, ओढकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांमध्ये अशक्तपणा येऊन ते शारीरिकदृष्ट्या कमकुवत होताता. त्यामुळे शेतकऱ्यांचे व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील १०० टक्के पशुधनास लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सात लाख पशुधन

जिल्ह्यात सुमारे सात लाख पशुधन आहे. त्यात गायवर्ग ३ लाख ३६ हजार ९०७, म्हैसवर्ग ७२ हजार १००, शेळ्या २ लाख ७२ हजार ७५३, मेंढ्या १५ हजार २७६ असे एकूण ६ लाख ९७ हजार ३६ पशुधन आहे. त्यांना सहा महिन्यांच्या अंतराने वर्षांतून २ वेळा लसीकरण करावयाचे आहे. यासाठी पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यास ३ लाख ४१ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. जनावरांची ओळख पटविण्यासाठी कानात लावावयाचे टॅग व ॲपलिकेटरही या मोहिमेंतर्गत लावण्यात येणार आहेत. पशुपालकांनी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधून कळपातील ४ ते ६ महिन्यांवरील सर्व जनावरांना लाळ्या खुरकुत प्रतिबंधक लस द्यावी, असे आवाहन डॉ. भारूड आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com