agriculture news in Marathi Vaccination for cattle in March Maharashtra | Agrowon

पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरण

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

राज्यात मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, कालवडी, शेळ्यांची संख्या आहे. त्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत दरवर्षी लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाते. यंदाही पहिल्या टप्प्यात १५ मार्चनंतर या जनावरांसाठी लाळ्या खुरकत, ब्रुसोलोसीस या दोन्ही प्रकारचे लसीकरण केले जाणार आहे.
- डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे

पुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. यंदा आयुक्तालयाकडून जनावरांना लाळ्याखुरकत आणि ब्रुसेलोसीस (संसर्गजन्य गर्भपात) या दोन्ही आजारांसाठी राज्यातील सुमारे दोन कोटी १४ लाख जनावरांना येत्या १५ मार्चनंतर लसीकरण केले जाणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जातो. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, कालवडीचा सांभाळ करतात. मात्र, अनेक वेळा जनावरांना लाळ्याखुरकत, ब्रुसेलोसीस या दोन्ही प्रकारच्या विषाणूजन्य आजारांना बळी पडतात. म्हणून शासनामार्फत लाळ्याखुरकत या आजारावर वर्षातून दोन वेळा लसीकरण केले जाते. प्रामुख्याने मार्च-एप्रिल आणि सप्टेंबर-ऑक्टोबर अशा महिन्यात लसीकरण केले जाते. तर ब्रुसोलोसीस या आजारासाठी वर्षाभरात केव्हाही लसीकरण केले जाते. 

यंदा केंद्र शासनाने जनावरासाठी लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्तालयाने शासनाकडे लसीकरणासाठी सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. केंद्र शासनाने मागणी केलेल्या निधीला मंजुरी दिली असून लसीकरणाची मोहीम मार्च महिन्यात हाती घेतली जाणार आहे.

लसीकरण शासकीय पशुवैद्यकामार्फत केले जाणार असले तरी यामध्ये खाजगी पशुवैद्यक, जिल्हा दूध संघ, तालुका दूध संघ यांनीही या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी केले.

राज्यात असलेल्या जनावरांची संख्या
गायी    एक कोटी ३९ लाख
म्हशी    ५६ लाख
शेळ्या    १ कोटी ६ लाख
कालवडी    २४ लाख
 


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...