सांगलीत चार लाख जनावरांना लाळ खुरकूतचे लसीकरण

सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने आत्तापर्यंत ४ लाख ८ हजार ३४८ जनावरांना लाळ खुरकूत या साथीच्या आजाराचे लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त विभागाच्या सूत्रांनी दिली.
सांगलीत चार लाख जनावरांना लाळ खुरकूतचे लसीकरण Vaccination of four lakh animals against measles in Sangli
सांगलीत चार लाख जनावरांना लाळ खुरकूतचे लसीकरण Vaccination of four lakh animals against measles in Sangli

सांगली  : जनावरांच्या संभाव्य लाळ खुरकूत आजाराच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन राज्य शासन व जिल्हा परिषदेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ४ लाख ८ हजार ३४८ जनावरांना लाळ खुरकूत या साथीच्या आजाराचे लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात सुमारे १३ लाख १६ हजार २०२ जनावरांची संख्या आहे. गाय, बैल, म्हैस आदी पशूंसाठी घातक असणारा हा रोग विषाणूजन्य आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांत जनावरांना लाळ खुरकूत रोगाचा प्रार्दुभाव होण्याचा धोका अधिक असतो. जनावरांना ताप येणे, तोंडाला फोड येऊन जखमा होणे, खुरांना जखमा होणे, अशी त्याची लक्षणे आहेत. काही खाऊच शकत नसल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन पशुधन दगावते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्‍यातील विविध ठिकाणी लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांना लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी ७ लाख ३७ हजार लसीचे डोस उपलब्ध केले आहेत. प्रत्येक तालुक्यानिहाय लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ०८ हजार ३४८ जनावरांना लसीकरण केले असून, उर्वरित जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. लसणीकरणाबरोबर इअर टॅगिंग देखील केले जाते आहे. इअरटॅगिंगमुळे जनावरांची विक्री केल्यास त्या जनावरांना आतापर्यंत कोणत्या लसी दिल्या आहेत. याची माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लाळ खुरकूत लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. गावातील पशुपालकांनी जनावरांना लसीकरण केले नसेल तर त्वरित नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे. -डॉ. संजय धकाते,  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली.

जिल्ह्यातील पशूधन     

  • मोठी जनावरे     ६,६७,६३५
  • लहान जनावरे     १,६६,५४५
  • शेळ्या-मेंढ्या     ४,८२,०२२
  • एकूण     १३,१६,२०२
  • तालुकानिहाय जनावरांना केलेले लसीकरण     तालुका    जनावरांची संख्या

  • मिरज    ४८,४५०
  • कवठेमहांकाळ    ३७,७९४
  • जत    ४३,२८३
  • आटपाडी    ३५,६०६
  • खानापूर    ३१,६८७
  • तासगाव    ३७,८२४
  • वाळवा    ७१,०५०
  • शिराळा    ४५,३१४
  • पलूस    १९,०५९
  • कडेगाव    ३८,२८१
  • एकूण    ४,०८,३४८
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com