Agriculture News in Marathi Vaccination of livestock in Sangli stalled | Page 2 ||| Agrowon

सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

सांगली जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार ५९३ इतकी आहे. त्यापैकी २ लाख ७८ हजार ५०८ इतक्या जनावरांना घटसर्प, फऱ्या आंत्रविषार अशा साथींच्या रोगांचे लसीकरण केले आहे.

सांगली : जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार ५९३ इतकी आहे. त्यापैकी २ लाख ७८ हजार ५०८ इतक्या जनावरांना घटसर्प, फऱ्या आंत्रविषार अशा साथींच्या रोगांचे लसीकरण केले आहे. अर्थात, ८ लाख २५ हजार ०८५ जनावरांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे लसीकरण कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न पशुपालक उपस्थित करू लागले आहेत. 

जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ३ हजार ५९३ इतकी आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर या पशुधनांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले जाते.

पावसाळ्यात गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या 
आणि शेळ्या-मेंढ्यांना आंत्रविषार असा साथीच्या रोगाचा फटका बसतो. यामुळे जनावरांना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग जनावरांना लसीकरण करण्याची 
मोहीम मे महिन्यापासून सुरुवात करतात. प्रामुख्याने पूरग्रस्त भागात लसीकरणाला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली. परंतु लसीकरण करण्यास पशुसंवर्धन विभागाकडून गती नसल्याचे दिसते आहे. पावसाळा संपत आला तरी अजून लसीकरण झाले नाही. 

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातले होते. जिल्ह्यात आतापर्यंत शंभरावर जनावरे दगावली होती. अशा स्थितीत लाळ्या खूरकूतच्या लसी अद्यापही जिल्ह्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लाळ्या खूरकूतचे लसीकरण रखडले असल्याचे चित्र आहे. लसी वेळेत आल्या नाही तर दोन वर्षांसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनांचे आरोग्य धोक्यात असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. 

पशुधन आकडेवारी 
गाई ः ३ लाख २४ हजार ७५६ 
म्हशी ः ४ लाख ९३ हजार ९५८ 
शेळ्या ः ४ लाख ५४ हजार१२५ 
मेंढ्या ः १ लाख ३०, ७५४ 
एकूण ः ११ लाख ०३५९३ 

ऑगस्ट अखेर झालेले लसीकरण संख्या 
घटसर्प...८९ हजार ९१४ 
फऱ्या...२७ हजार ००६ 
आंत्रविषार...१ लाख ५६ हजार ५८८ 

 


इतर बातम्या
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...