लम्पी आजारावर लस लवकर उपलब्ध करावी

जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात जनावरांमध्ये लम्पी या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. काही जनावरांचा यामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वाढती चिंता लक्षात घेता या आजारावर लस तात्काळ उपलब्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
Vaccines for lumpy disease should be made available early
Vaccines for lumpy disease should be made available early

गोंदिया : जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात जनावरांमध्ये लम्पी या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. काही जनावरांचा यामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वाढती चिंता लक्षात घेता या आजारावर लस तात्काळ उपलब्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

सालेकसा येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार हा आजार संसर्गजन्य असून एका जनावरापासून दुसऱ्याला होतो. जनावराच्या पायाला सूज येणे, शरीरावर मोठमोठे व्रण येणे या प्रकारची लक्षणे दिसून येतात. तत्काळ उपाययोजना न केल्यास या आजाराचा संसर्ग होऊन संपूर्ण परिसरातील जनावरांत मध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता बळावते. शेतीत राबणाऱ्या जनावरांप्रति कृतज्ञता म्हणून नुकताच बैलपोळा साजरा करण्यात आला. या दिवशी जनावरांचे मनोभावे पूजन करण्यात आले. परंतु तीच जनावरे आज लम्पी आजाराने ग्रस्त होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्ह्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून यांत्रिकीकरणाऐवजी बैलांच्या माध्यमातून शेती या भागात होते. त्यामुळे दैनंदिन शेतीकामात बैलांचा वापर होतो. अशा परिस्थितीत लम्पी सारख्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. त्याची दखल घेत तत्काळ उपाययोजना करून आजारावरील लस त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी उपाध्यक्ष दिलीप ढेकवार, ध्रुव हुकरे, गोल्डी भाटीया, रोहित बनोठे, मयूर पाथोडे, स्वप्नील करवाडे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदारांशी केली चर्चा लम्पी रोगा संदर्भात आमदार सहसराम कोरोटे, आमदार विनोद अग्रवाल यांच्याशी फोनवरून चर्चा करून विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात देण्यात आले. या आजारावर लस उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com