वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान

वऱ्हाडात १५ मतदारसंघांतील उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद
वऱ्हाडात १५ मतदारसंघांतील उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद

अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता. २१) वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांमध्ये १५ मतदारसंघात मतदान झाले. दुपारी पाच वाजेपर्यंत तीन ही जिल्ह्यात मतदान उत्स्फुर्तपणे झाले. मतदानासाठी सकाळपासूनच ठिकठिकाणी रांगा दिसून येत होत्या. ग्रामीण भागात सोयाबीन हंगाम जोरात असल्याने शेतमजुरांनी सकाळी कामे उरकून दुपारच्या सत्रात मतमोजणी केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद झाले असून गुरुवारी (ता. २४) त्यांच्या भाग्याचा फैसला बाहेर येणार आहे.

वाशिम जिल्ह्यात ६१.९९ टक्के मतदान... रिसोड ६६.१३ टक्के, वाशिम ५८.८४ टक्के, कारंजा ६१.४१ टक्के

बुलडाणा जिल्ह्यात ६४.९९ टक्के मतदान मलकापूर ६८.९० टक्के, बुलडाणा ५७.७६ टक्के, चिखली ६५.४९ टक्के, सिंदखेड राजा ६४.०६ टक्के, मेहकर ५९.२३ टक्के, खामगांव  ७०.३९ टक्के, जळगांव जामोद ७०.०८ टक्के अकोला जिल्ह्यात ५७.८०  टक्के मतदान अकोट ६३.८३, बाळापूर ६५.८९, अकोला पश्‍चिम ५०.८२, अकोला पूर्व ५५.७७, मूर्तिजापूर ५४.४२

अकोला जिल्ह्यात पाच, बुलडाण्यात सात आणि वाशीम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यात चुरस वाढली. सुरवातीला काही ठिकाणी एकतर्फी दिसणारी लढत कुठे तिरंगी, कुठे चौरंगी बनली. प्रामुख्याने विचार केला तर अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, वाशीममध्ये कारंजा, रिसोड, बुलडाण्यात सिंदखेडराजा, बुलडाणा, मलकापूर, चिखली या मतदारसंघात जोरदार लढती आहेत. 

शेवटच्या टप्प्यात या ठिकाणचे चित्र बदलल्याचे दिसून येते. १५ पैकी १२ मतदारसंघात काट्याच्या लढती होणार असल्याचे राजकीय अंदाज व्यक्त होत आहेत. 

  • काट्याच्या लढती होणारे मतदारसंघ व तेथील उमेदवार पुढीलप्रमाणे ः
  • अकोला पश्चिम -गोवर्धन शर्मा (भाजप), मो. सज्जाद (काँग्रेस), मदन भरगड (वंचित आघाडी)
  • अकोट - प्रकाश भारसाकळे (भाजप), संजय बोडखे (काँग्रेस), अनिल गावंडे (अपक्ष)
  • बाळापूर - नितीन देशमुख (शिवसेना), संग्राम गावंडे (राष्ट्रवादी), धैर्यवर्धन पुंडकर (वंचित)
  • कारंजा - प्रकाश डहाके (राष्ट्रवादी), राजेंद्र पाटणी (भाजप)
  • रिसोड - अमित झनक (काँग्रेस), विश्वनाथ सानप (शिवसेना), अनंतराव देशमुख (अपक्ष)
  • सिंदखेडराजा - शशिकांत खेडेकर (शिवसेना), डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
  • बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस), संजय गायकवाड (शिवसेना), विजयराज शिंदे (वंचित आघाडी), योगेंद्र गोडे (अपक्ष)
  • मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप), राजेंद्र एकडे (काँग्रेस)
  • चिखली - राहुल बोंद्रे (काँग्रेस),  श्वेता महाले (भाजप)
  • जळगाव जामोद - डॉ. संजय कुटे (भाजप), डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस), संगीतराव भोंगळ (वंचित बहुजन आघाडी)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com