वडनेरभैरव ग्रामपालिका उचलणार मुलींच्या प्रवासाचा खर्च

vadner grampalika will take the travel expence of girls
vadner grampalika will take the travel expence of girls

नाशिक : सुरक्षेचा प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी गावात वा शहरात जाता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुलींचे शिक्षण अर्ध्यावरच थांबते. यासाठी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव ग्रामपालिकेने अभिनव पाऊल उचलले आहे. गावाच्या हद्दीतून महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावात येणाऱ्या किंवा इतरत्र कुठल्याही गावी जाणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या बस प्रवासाचा वार्षिक खर्च आता ग्रामपंचायत उचलणार आहे. याची सुरुवात म्हणून पहिल्या हप्त्याचा ३ लाख १५ रुपयांचा धनादेश गावातील महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.  ग्रामपालिकेने मुलींच्या शिक्षणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या सुमारे २१०  मुलींचा खर्च या माध्यमातून पहिल्या टप्प्यात उचलण्यात आला आहे. सरपंच शांताबाई बेंडके यांनी मविप्रचे संचालक माजी आमदार उत्तमबाबा भालेराव आणि प्राचार्य अमोल भगत यांच्याकडे विशेष समारंभात धनादेश सुपूर्त केला. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीपराव धारराव, हिरामण शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मविप्र संचालक उत्तमबाबा भालेराव म्हणाले, वडनेर भैरव ग्रामपालिकेने घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी प्रेरणादायी आहे. मुलींनी या मदतीचा त्यांचा हेतू साध्य करावा असे आवाहन केले. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच योजना असून, ग्रामपंचायत या पुढे नियमितपणे यासाठीच्या निधीची तरतूद करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.  प्रतिक्रियाः वडनेर भैरव ग्रामपालिका हद्दीत राहणाऱ्या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची बस फी यापुढे ग्रामपालिका भरणार असून, त्याचा प्रथम हप्ता आम्ही आता धनादेश स्वरूपात देत आहोत.  - रावसाहेब भालेराव,  उपसरपंच, वडनेरभैरव ग्रामपालिका 

मुलींच्या शिक्षणासाठी गावाने विश्वास दाखवून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले असून त्यांनी आमच्या कडून केलेल्या अपेक्षांचा भंग होणार नाही. - अनुष्का पाचोरकर, विद्यार्थिनी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com