पोटदुखीवर गुणकारी वाघेटी

पोटदुखीवर गुणकारी वाघेटी
पोटदुखीवर गुणकारी वाघेटी

वाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात. महाराष्ट्रात कोकण, पश्चिमघाटात मोठ्या प्रमाणात वाघेटीच्या वेली आढळतात.  

 वनस्पतीची ओळख ः

  • वाघेटी हा बहुवर्षीय काटेरी वेल आहे. याचे खोड गोलाकार असून फांद्या मोठ्या प्रमाणात इतरत्र पसरतात.
  • पाने साधी, एका आड एक, लांबट-गोल टोकदार व चमकणारी असतात. काटे टोकदार, वाकडे, चपटे असून जोडीने पानाच्या बेचक्यातून येतात.
  • काटे वाघाच्या नखासारखे असल्यामुळे या वेलीला वाघेटी किवा व्याघ्रनखी असे म्हणतात. फुले पांढरी किंवा फिकट गुलाबी, द्विलिंगी, नियमित असून पानांच्या बगलेतून एक किंवा दोन अशी येतात. 
  • पुष्प कोश ४ दलांचा, ४ पाकळ्या मोकळ्या असतात. फिकट गुलाबी पुंकेसर पाकळ्यापेक्षा लांब असते. बीजांडकोशाचा देठ पुंकेसरापेक्षा किंचित लांब असतो. 
  • फळ गोल, हिरवट-तांबूस अनेक बिया (काळ्या) आणि गरयुक्त असून फळ पिकल्यावरती लाल होऊन तडकते.
  •  औषधी गुणधर्म 

  •  वाघाटी उष्ण, उत्तेजक, असून पित्तनाशक आहे. 
  •  उष्णतेमुळे अंगावर वळ उठल्यावर मूळ उगाळून लेप लावतात. 
  •  वाघाटी क्षयरोगावर अत्यंत गुणकारी औषध आहे.
  •  वाघाटीचे फळ कफ, वायू यांचा नाश करते.
  •  फळ उगाळून पाण्यातून पोटदुखीवर इलाज म्हणून पिण्यासाठी देतात.   
  • स्थानिक नाव वाघेटी/वाघाटी /गोविंदफळ/गोविंदी/कडू वाघांटी
    शास्त्रीय नाव Capparis zeylanica L.
    कूळ Capparaceae
    इंग्रजी नाव Thorny Capper Brush, Ceylon Caper
    संस्कृत नाव व्याघ्रनखी, कराम्भा, तपसप्रिय
    उपयोगी भाग कोवळे फळ
    उपलब्धीचा काळ कोवळे फळ- जून-ऑगस्ट,  फेब्रुवारी- एप्रिल
    अभिवृद्धी बिया
    वापर भाजी

    पाककृती : कोवळ्या फळाची भाजी  साहित्य  २०० ग्रॅम वाघेटीची कोवळी फळे, २-३ बारीक चिरलेले कांदे, ३-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, १-२ चमचा लाल मिरची पावडर,१ चमचा धने पावडर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, तेल, चवीपुरते मीठ व कोंथिबीर. 

     कृती प्रथम वाघेटीची कोवळी फळे स्वच्छ धुऊन देठाचा भाग कापून घ्यावा. बारीक फोडी करून बिया काढून टाकाव्यात. कढईत तेल गरम करून कडीपत्ता, जिरे, हिंग, मोहरीची फोडणी तयार करावी. नंतर कांदा व लसूण तेलात चांगला शिजवून घ्यावा. त्यात  हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर व फोडी टाकून चांगले परतवून घ्यावे. झाकण ठेऊन मऊ होईपर्यत  शिजवून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ मिसळावे.  बारीक चिरलेली कोंथिबीर भाजीवर पसरावी.

    टीप : ही भाजी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी खातात.  : अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६ (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com