बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात` विम्याचा होणार लाभ
नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. काहिंना अंपगत्व येते. अशा शेतकरी कुटुंबास तसेच ज्यांच्या नावावर शेती नाही, अशा वहितीदार शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळणार आहे.
नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. काहिंना अंपगत्व येते. अशा शेतकरी कुटुंबास तसेच ज्यांच्या नावावर शेती नाही, अशा वहितीदार शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळणार आहे. अशा बाधित कुटुंबाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा’’, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा धक्का बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील वाहन अपघात, अन्य कारणामुळे होणारे अपघात, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबांतील कोणतेही एक सदस्य यामध्ये आई, वडील, शेतकऱ्यांचे पती, पत्नी, मुलगा व अविवाहित यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे दहा ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण दोन जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली.
विमा संरक्षणासाठी रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे मृत्यु, विजेचा धक्का आदी अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास लाभ मिळू शकतो.
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दिनांकासहित पत्र (मुळ प्रत), संपूर्ण दावा अर्ज वारसदाराच्या मोबाईल नंबरसहीत सहित भरलेला, वारसदाराचे नॅशनलाईज बॅक खाते पुस्तक, घोषणापत्र अ व ब (अर्जदाराच्या फोटो सहित), वयाचा दाखला सातबारा सहा ‘क’, सहा ‘ड’ फेरफार मुळ प्रत, मृत्यू प्रमाणपत्र (मुळ प्रत) (एफआयआर) प्रथम माहिती अहवाल, अकस्मात मृत्युची खबर, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अपघात नोंदणी ४५ दिवासांच्या आत करावी.
ज्या शेतकऱ्याच्या वहिती खातेधारक म्हणून नोंद आहे. त्याचा वारस म्हणून प्रस्ताव सादर करतो आहे. त्या शेतकऱ्याच्या सातबारा उतारा, सहा ड (जुना फेरकार), अपघातासंबंधी सर्व लागणारी कागदपत्रे जशीच्या तशी शिधापत्रिका, वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांशी नाते स्पष्ट करणारी कागदपत्रे (पुरावा).
- 1 of 1025
- ››