महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
व्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल गुलाबाची मागणी
पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची मागणी वाढली असून, २० फुलांच्या गड्डीला पुणे बाजार समितीमध्ये १८० ते २०० रुपये दर मिळत आहे. १४ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या या दिवसासाठी एक आठवडा अगोदरपासूनच खरेदीदारांकडून मागणी सुरू होते. हा दर बुधवार (ता. १३) पर्यंत २५० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता फुलबाजार संघटनेचे अध्यक्ष अरुण वीर यांनी व्यक्त केली.

वीर म्हणाले, ‘‘पॉलिहाउसमध्ये उत्पादित होणाऱ्या गडद लाल रंगाच्या फुलांना परदेशांतदेखील मागणी असते. यामुळे निर्यात संपल्यानंतर देशातंर्गत बाजारपेठेत फुलांचा पुरवठा सुरू होतो. पुणे बाजार समितीमध्ये खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव (दाभाडे) येथून फुलांची आवक होत असते. व्हॅलेंटाइन डेसाठी खरेदीदारांकडून एक आठवडा अगोदर मागणी सुरू होते. सध्या रोज सुमारे दीड ते अडीच हजार जुड्यांची आवक होत आहे. या वेळी दर हा ५० ते ६० सें.मी.च्या फुलांना १८० ते २००, तर ४० सेमीला १३० ते १४० रुपये आहे. तो व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवसापर्यंत २५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.‘‘
समाज माध्यमांमुळे तरुणामध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची फॅशन वाढली आहे. फुलांना मागणी वाढली आहे. हीच फुले किरकोळ बाजारात प्रति फूल ३० रुपयांपर्यंतदेखील विक्री होण्याची शक्यता आहे, असेही वीर यांनी नमूद केले.