Agriculture news in marathi Validation, base authentication in the database, eligible listings on the panel | Agrowon

नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण, पात्र याद्या लावल्या फलकावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदर्खे आणि खोंडामळी येथील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध करत आधार प्रमाणीकरणास सुरुवात करण्यात आली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या  २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. 

नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदर्खे आणि खोंडामळी येथील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध करत आधार प्रमाणीकरणास सुरुवात करण्यात आली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या  २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली, त्यात वरील दोन्ही गावांचा समावेश आहे. तेथील आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्य सोसायटी शाखा, जिल्हा बॅंक शाखा अशा विविध ठिकाणी ही यादी प्रदर्शित करण्यात आली. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया इतरही गावांमध्ये तातडीने सुरू करण्यात येणार आहे. 

यादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येत असून प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. प्रमाणपत्र प्राप्त शेतकऱ्यांना शासनातर्फे कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. प्रमाणिकरण करताना खाते क्रमांक, आधार आणि बोटांचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे.

 जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आणि सहायक उपनिबंधक निरज चौधरी यांनी दोन्ही गावांना भेट देऊन प्रमाणिकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते खोंडमाळी येथे प्रातिनिधीक स्वरूपात आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मंगळवारीदेखील ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


इतर बातम्या
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...