दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडी

दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक असतात. यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, थायमिन, लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅंगनिज असे विविध पोषक घटक असतात. दुधी भोपळ्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जातात.
value added products of  bottle gourd
value added products of  bottle gourd

बऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही. मात्र, यापासून केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ नक्कीच आवडीने खाल्ले जातात. दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक असतात. यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, थायमिन, लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅंगनिज असे विविध पोषक घटक असतात. दुधी भोपळ्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जातात.  औषधी गुणधर्म 

  • दुधीचा रस १ वाटी, लिंबू रस १ चमचा आणि मध १ चमचा एकत्रित करून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मूत्रविकार कमी होतात.
  • त्वचेची कांती उजळण्यास दुधीचा रस, जायफळ पूड आणि मध एकत्रित करून लावल्यास फायदेशीर ठरते.
  • एक चमचा आवळा चूर्ण, दुधी भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यातून घेतल्याने झोप चांगली लागते. पोट साफ होते.
  • लहान मुलांच्या छातीतील कफ दूर करण्यास फायदेशीर आहे. दुधीचा रस आटवून त्यात मिरे पिंपळी वाटून मधात मिसळून त्याचे चाटण द्यावे.
  • दुधीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ह्रदय विकाराच्या रुग्नांनी सकाळ आणि संध्याकाळी १ वाटी दुधीचा रस घ्यावा.
  • वजन कमी करण्यासाठी दुधीचा रस फायदेशीर आहे.
  • केसांच्या आरोग्यासाठी दुधी रस तेलात मिसळून केसांना लावावा. केस मजबूत होऊन वाढण्यास मदत होते.
  • दुधी भोपळ्याचा रस शरीरासाठी पौष्टिक असतो. रोज सकाळी १ ग्लास दुधीचा रस पिल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
  • मधुमेहावर दुधी भोपळा गुणकारी मानला जातो. दुधीमधील मधुमेह विरोधी गुणधर्म रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 
  • प्रक्रियायुक्त पदार्थ टुटीफुटी  परिपक्व दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. बोजणीच्या साह्याने त्यास लहान छिद्रे पाडून २ ते ३ सेंमी लांबीचे तुकडे करावेत. हे तुकडे उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे गरम करावेत. नंतर ५० टक्के साखरेच्या पाकात तुकडे टाकून त्यात ०.२ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. हे मिश्रण २४ तास मुरवण्यासाठी ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्याच पाकामध्ये साखर टाकून साखरेचे प्रमाण ६० टक्के करावे. आणि पुन्हा २४ तास मुरण्यासाठी ठेवावे. शेवटी ७० टक्के साखरेच्या पाकात ५ ते ६ तास काप ठेवावेत. सहा दिवसानंतर काप साखरेच्या पाकातून काढून चांगले निथळून घ्यावेत. सावलीत किंवा पंख्याखाली ४८ तासांपर्यंत वाळवावे. तयार टुटीफुटीची स्वच्छ ठिकाणी साठवण करावी. पावडर  पावडर करण्यासाठी परिपक्व दुधी भोपळा निवडावा. दुधी स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे पातळ काप करावेत. पातळ कापास ८० अंश सेल्सिअस तापमानास ४ मिनिटे गरम पाण्याची प्रक्रिया (ब्लांचींग) करावी. वाळवण यंत्रामध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानास १५ ते १६ तास काप वाळवावेत. काप पूर्ण वाळल्यानंतर ग्राइंडर मशीनमधून त्याची पावडर तयार करून घ्यावी. तयार पावडर चाळून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून सील करावी. थंड किंवा कोरड्या वातावरणात साठवण करावी. साधारणतः १ किलो भोपळ्यापासून ६० ग्रॅम पावडर मिळते.  वडी  परिपक्व दुधी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढावी. दुधीचे मोठे मोठे काप करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. नंतर दुधीभोपळा किसून घ्यावा. किसाचे वजन करून मंद आचेवर तुपामध्ये परतून घ्यावा. त्यामध्ये गरजेप्रमाणे साखर, विलायची पूड, दूध पावडर टाकून घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते तूप लावलेल्या ट्रे वर ओतावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून त्यावर सुकामेव्याची पूड लावावी. संपर्क- चंद्रकला सोनवणे, ७९७२९९९४६४ (के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com