agriculture news in marathi value added products of bottle gourd | Agrowon

दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडी

चंद्रकला सोनवणे 
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक असतात. यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, थायमिन, लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅंगनिज असे विविध पोषक घटक असतात. दुधी भोपळ्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जातात. 
 

बऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही. मात्र, यापासून केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ नक्कीच आवडीने खाल्ले जातात. दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक असतात. यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, थायमिन, लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅंगनिज असे विविध पोषक घटक असतात. दुधी भोपळ्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जातात. 

औषधी गुणधर्म 

  • दुधीचा रस १ वाटी, लिंबू रस १ चमचा आणि मध १ चमचा एकत्रित करून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मूत्रविकार कमी होतात.
  • त्वचेची कांती उजळण्यास दुधीचा रस, जायफळ पूड आणि मध एकत्रित करून लावल्यास फायदेशीर ठरते.
  • एक चमचा आवळा चूर्ण, दुधी भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यातून घेतल्याने झोप चांगली लागते. पोट साफ होते.
  • लहान मुलांच्या छातीतील कफ दूर करण्यास फायदेशीर आहे. दुधीचा रस आटवून त्यात मिरे पिंपळी वाटून मधात मिसळून त्याचे चाटण द्यावे.
  • दुधीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ह्रदय विकाराच्या रुग्नांनी सकाळ आणि संध्याकाळी १ वाटी दुधीचा रस घ्यावा.
  • वजन कमी करण्यासाठी दुधीचा रस फायदेशीर आहे.
  • केसांच्या आरोग्यासाठी दुधी रस तेलात मिसळून केसांना लावावा. केस मजबूत होऊन वाढण्यास मदत होते.
  • दुधी भोपळ्याचा रस शरीरासाठी पौष्टिक असतो. रोज सकाळी १ ग्लास दुधीचा रस पिल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
  • मधुमेहावर दुधी भोपळा गुणकारी मानला जातो. दुधीमधील मधुमेह विरोधी गुणधर्म रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

प्रक्रियायुक्त पदार्थ
टुटीफुटी 

परिपक्व दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. बोजणीच्या साह्याने त्यास लहान छिद्रे पाडून २ ते ३ सेंमी लांबीचे तुकडे करावेत. हे तुकडे उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे गरम करावेत. नंतर ५० टक्के साखरेच्या पाकात तुकडे टाकून त्यात ०.२ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. हे मिश्रण २४ तास मुरवण्यासाठी ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्याच पाकामध्ये साखर टाकून साखरेचे प्रमाण ६० टक्के करावे. आणि पुन्हा २४ तास मुरण्यासाठी ठेवावे. शेवटी ७० टक्के साखरेच्या पाकात ५ ते ६ तास काप ठेवावेत. सहा दिवसानंतर काप साखरेच्या पाकातून काढून चांगले निथळून घ्यावेत. सावलीत किंवा पंख्याखाली ४८ तासांपर्यंत वाळवावे. तयार टुटीफुटीची स्वच्छ ठिकाणी साठवण करावी.

पावडर 
पावडर करण्यासाठी परिपक्व दुधी भोपळा निवडावा. दुधी स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे पातळ काप करावेत. पातळ कापास ८० अंश सेल्सिअस तापमानास ४ मिनिटे गरम पाण्याची प्रक्रिया (ब्लांचींग) करावी. वाळवण यंत्रामध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानास १५ ते १६ तास काप वाळवावेत. काप पूर्ण वाळल्यानंतर ग्राइंडर मशीनमधून त्याची पावडर तयार करून घ्यावी. तयार पावडर चाळून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून सील करावी. थंड किंवा कोरड्या वातावरणात साठवण करावी. साधारणतः १ किलो भोपळ्यापासून ६० ग्रॅम पावडर मिळते. 

वडी 
परिपक्व दुधी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढावी. दुधीचे मोठे मोठे काप करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. नंतर दुधीभोपळा किसून घ्यावा. किसाचे वजन करून मंद आचेवर तुपामध्ये परतून घ्यावा. त्यामध्ये गरजेप्रमाणे साखर, विलायची पूड, दूध पावडर टाकून घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते तूप लावलेल्या ट्रे वर ओतावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून त्यावर सुकामेव्याची पूड लावावी.

संपर्क- चंद्रकला सोनवणे, ७९७२९९९४६४
(के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)


इतर कृषी प्रक्रिया
आरोग्यदायी गुलकंदगुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला...
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थअंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते....
प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य...भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
करार शेती यशस्वी होण्यासाठी पारदर्शकता...बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
आहार अन्‌ प्रक्रिया उद्योगासाठी...भरड धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने स्वस्त असतात....
काशीफळापासून रायता, सूप, हलवाकाशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ...
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...