बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थ

शेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत. त्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. प्रोव्हिटॅमीन ए, जीवनसत्त्वे बी आणि सी, खनिजे (विशेषत: लोह) आणि गंधकयुक्त अमीनो अॅसिड मेथिओनिन आणि सिस्टीन याचे चांगले स्रोत आहेत. शेवगा हे संबंधित पाने, शेंगा आणि बियाण्यातील पौष्टिक मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. शेवग्यातील उपलब्ध पौष्टिक पदार्थांच्या आहारातील वापरासाठी मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती केली जाते.
Value added products of drumsticks
Value added products of drumsticks

शेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत. त्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. प्रोव्हिटॅमीन ए, जीवनसत्त्वे बी आणि सी, खनिजे (विशेषत: लोह) आणि गंधकयुक्त अमीनो अॅसिड मेथिओनिन आणि सिस्टीन याचे चांगले स्रोत आहेत. शेवगा हे संबंधित पाने, शेंगा आणि बियाण्यातील पौष्टिक मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. शेवग्यातील उपलब्ध पौष्टिक पदार्थांच्या आहारातील वापरासाठी मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती केली जाते. मूल्यवर्धित पदार्थ  रस 

  • ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्यावे.
  • तयार मिश्रण गाळून त्याचा रस काढावा. या रसाचे सेवन करण्यापूर्वी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून एक चमचा मध टाकावा. यामुळे त्याचा कडसरपणा कमी होतो.
  • मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी, शेवग्याच्या कोंबांना (४० दिवसांपेक्षा जास्त जुन्या नसलेल्या) हॅमर मिलच्या साहाय्याने बारीक करून घ्यावे. त्यासाठी थोडेसे पाणी (प्रती १० किलो कोंबांसाठी एक लीटर) वापरले जाते. नंतर ते गाळून पाण्याने आवश्यक तितके पातळ केले जाते. चवीनुसार साखर टाकावी.
  • पावडर 

  • कापणीनंतर पाने काढून, सावलीत धुऊन वाळवली जाते. सूर्यप्रकाशात वाळल्यास त्यातील जीवनसत्त्व ए नष्ट होऊ शकते. वाळलेल्या पानापासून ग्राइंडरमध्ये पावडर बनवली जाते.
  • पौष्टिक पदार्थ म्हणून, २ किंवा ३ चमचा पावडर सूप किंवा सॉसमध्ये वापरला जाऊ शकतो. पावडर प्रकाश आणि आर्द्रतेपासून संरक्षित असल्यास १८० दिवसांपर्यंत (६ महिने) साठवता येते.
  • तेल 

  • तेल हे बियाण्याचे मुख्य घटक आहेत. ते बियाणे वजनाच्या ३६.७ टक्के असते. सॉल्व्हंट एक्सट्रक्शन (एन - हेक्सेन) आणि कोल्ड प्रेसद्वारे तेल काढता येते. सौदर्य प्रसाधन उद्योगामध्ये शेवग्याच्या तेलाचा वापर केला जातो. प्रामुख्याने मॉयश्चरायझर आणि त्वचा कंडिशनर निर्मितीमध्ये त्याचा वापर केला जातो. शरीर आणि केसांची निगेमध्ये त्याचा उपयोग होतो. या तेलाचा वापर खाद्य तेलामध्येही करता येऊ शकतो.
  • आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या तेलामध्ये अँटीट्यूमर, अँटीपायरेटिक, एंटी-इंफ्लेमेंटरी, कोलेस्टेरॉल कमी करणे, अँटीऑक्सिडंट, जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल असे अनेक गुणधर्म आहेत.
  • टॅब्लेट आणि कॅप्सूल शेवग्याच्या पावडरपासून गोळ्या आणि कॅप्सूल बनवता येतात. हे एक पूरक आहारामध्ये प्रथिनांच्या पूर्ततेसाठी वापरले जाते. गोळ्या व कॅप्सूल स्वरूपामध्ये थेट सेवन करणे सोपे होते. शेवग्याच्या पानाचा डिकाशीन चहा 

  • शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. सावली मध्ये वाळवून, त्याची बारीक पूड करून घ्यावी.
  • एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी. साखर टाकून तयार झालेल्या या शेवग्याच्या पानाच्या चहामध्ये ४ ते ५ थेंब लिंबू रस मिसळावा. हा चहा अतिशय गुणकारी असून चवीला चांगला लागतो.
  • संपर्क- उदयकुमार खोब्रागडे, ८६९८५७९६८९ (वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com