agriculture news in marathi value added products of Elephant Foot Yam | Agrowon

सुरणपासून रुचकर पदार्थ

पल्लवी कांबळे, अमर सोळंके
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

सुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. सुरणची भाजी, चटणी, लोणचे, फ्रेंच फ्रायज् आणि सूप असे पदार्थ तयार केले जातात. ताजे सुरण खाल्ल्याने घसा आणि तोंडात खाज सुटू शकते. त्यासाठी पदार्थ करतेवेळी आमचूर पावडर किंवा लिंबाचा वापर करावा. 
 

सुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. सुरणची भाजी, चटणी, लोणचे, फ्रेंच फ्रायज् आणि सूप असे पदार्थ तयार केले जातात. ताजे सुरण खाल्ल्याने घसा आणि तोंडात खाज सुटू शकते. त्यासाठी पदार्थ करतेवेळी आमचूर पावडर किंवा लिंबाचा वापर करावा. 

विविध पदार्थ 
सुरणची भाजी 
सुरणची भाजी बनवण्यापूर्वी ते चिंचेची पाने किंवा लिंबू रसाच्या पाण्याने धुऊन घ्यावे. प्रथम सुरणच्या वरील साल काढून त्याचे तुकडे करावेत. त्यानंतर उकळत्या पाण्यात तुरटी घालून त्यामध्ये सुरण टाकावे. व्यवस्थित उकळल्यानंतर सुरणची सुकी किंवा रस्सा भाजी करावी. भाजीमध्ये थोडासा आंबटपणा घालावा, अन्यथा घसा तोडतो.  

लोणचे 
प्रथम सुरणचे तुकडे सुकवून व्हिनेगारमध्ये टाकावेत. सर्व मसाले तेलात तळून त्यामध्ये सुरणचे उकडलेले तुकडे टाकावेत. तुरटपणा जाण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. तयार लोणचे भरणीमध्ये भरून हवाबंद करावे.

केक 
शिजवलेले तांदूळ आणि उकडलेले सुरण चांगले एकत्रित करून घ्यावे. त्यामध्ये गूळ, मीठ, बारीक चिरून शिजवलेले आले, काजू, मनुका, तळलेले नारळ व बेकिंग सोडा घालावा. मिश्रण चांगले एकजीव करावे. उभट भांड्यात तयार मिश्रण घेऊन ओव्हनमध्ये ४५-५० मिनिटे ठेवावे.

गुलाबजामून 
स्वच्छ केलेले सुरण लिंबाच्या पाण्याने धुऊन घ्यावे. गरम पाण्यामध्ये सुरण उकडून चांगले बारीक करून घ्यावे. गहू बारीक आकारून घ्यावा. स्टार्च, दूध पावडर, बेकिंग पावडर आणि तेल एकत्रित करून मिश्रण करावे. तयार मिश्रणाचे गोळे करून तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. तळलेले गोळे साखरेच्या पाकात मुरण्यासाठी ठेवावेत. 

खीर 
प्रथम सुरण चांगले धुऊन उकडून घ्यावे. शिजवलेल्या तांदळामध्ये दूध, काजू, मनुका आणि साखर घालावे. रूचकर खीर तयार होण्यासाठी मिश्रण चांगले शिजवून घ्यावे.

कटलेट 
सुरणचे मोठे तुकडे धुऊन उकडून घेऊन चांगले बारीक करावेत. त्यामध्ये आले पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ टाकावे. मिश्रण चांगले एकजीव करून त्यास कटलेटचा आकार द्यावा. कटलेट मैद्याच्या पाण्यात बुडवून नंतर तळून घ्यावे. तेलात तळण्याऐवजी कटलेट फ्राय देखील करता येते. 

पकोडा
सुरण बारीक चिरून त्यामध्ये लसूण, आले, कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरेपूड, चणा डाळ पीठ, बारीक चीज मिसळा. त्याचे लहान गोळे करून घ्यावेत. गोळे मंद आचेवर चांगले तळून घ्यावेत. तयार पकोडे चविष्ट लागतात. 

वडा 
उकडलेले आणि मॅश केलेले सुरण कंद तांदूळ पावडरसह मिसळून घ्यावे. चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, किसलेले नारळ, जिरे आणि मीठ एकत्रित करून एकजीव करावे. मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर त्याचे गोळे बनवावेत. तयार गोळे मंद आचेवर तेलात तळून घ्यावेत.

चटणी 
धुऊन उकडलेले सुरण भिजवलेल्या मेथीमध्ये टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. त्यामध्ये सौफ, मोहरी, कढीपत्ता, चिंचेची पेस्ट,  आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि नारळ पेस्ट एकत्रित करून घ्यावी. मिश्रण एकत्रित केल्यानंतर मंद आचेवर ५-१० मिनिटे शिजवावे.

चिप्स
प्रथम सुरण चांगले धुऊन सोलून घ्यावे. नंतर सुरण कंदाचे काप करावेत. कंदाचे काप लिंबू किंवा मिठाच्या पाण्यात थोडे उकडून घेऊन तीन दिवस कडक उन्हात वाळवावेत. वाळलेले सुरण चिप्स तेलात तळून मीठ आणि तिखट टाकून सर्व करा.

संपर्क- पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९०
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.)


इतर कृषी प्रक्रिया
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...